महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये प्रारंभ
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये प्रारंभ

महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये प्रारंभ

अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी महारेशीम नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. त्याच्या प्रचार रथाला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी हिरवा झेंडा दाखवला. याबरोबरच वाशीम जिल्ह्यातही या अभियानाचा प्रारंभ झाला.  

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला. २९ डिसेंबरपर्यंत गावोगावी हा रथ फिरणार आहे. त्याद्वारे रेशीम उद्याेगाची माहिती, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा, प्रात्यक्षिके दाखविण्यात येतील.

पजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोके, रेशीम विकास अधिकारी संजय शिंदे, प्रकल्प अधिकारी विजय ठाकरे, क्षेत्र सहायक सुनील मानकर, अनिल सुळकर आदी उपस्थित होते. 

वाशीममध्येही सुरवात वाशीम जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने जिल्ह्यात महारेशीम नोंदणी अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते झाला. त्यांनी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी अरविंद मोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जावून चित्ररथाद्वारे रेशीम शेतीविषयी जनजागृती केली जाईल. चित्ररथासोबत जिल्हा रेशीम कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com