agriculture news in Marathi, Mahatma phule agriculture university got 24 th rating, Maharashtra | Agrowon

महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात चोविसावे मानांकन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जुलै 2019

नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेने नुकतेच देशातील कृषी विद्यापीठांच्या प्रसिद्ध केलेल्या मानांकन यादीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठास २४ वा क्रमांक मिळाला आहे. २०१७ च्या यादीत विद्यापीठ ३४ व्या क्रमांकावर होते. राज्य पातळीवर विचार करता महात्मा फुले कृषी विद्यापीठ क्रमांक १ वर आहे.

नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेने नुकतेच देशातील कृषी विद्यापीठांच्या प्रसिद्ध केलेल्या मानांकन यादीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठास २४ वा क्रमांक मिळाला आहे. २०१७ च्या यादीत विद्यापीठ ३४ व्या क्रमांकावर होते. राज्य पातळीवर विचार करता महात्मा फुले कृषी विद्यापीठ क्रमांक १ वर आहे.

यंदाच्या यादीत दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास ३२ वे स्थान मिळाले, २०१७ साली या विद्यापीठाचा ५९ क्रमांक होता परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठास ४५ वे स्थान मिळाले, २०१७ साली ५२ वा क्रमांक होता. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास ४८ वे मानांकन मिळाले आहे. अकोल्याचे मानांकन ४२ वरून ४८ वर गेले आहे. कर्नाल येथील राष्ट्रीय दूध संशोधन संस्थेचा देशाच्या यादीत पहिला क्रमांक तर दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या नेतृत्वाखाली आणि अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाने विद्यापीठाने सन २०१८ सालासाठी मानांकनाचा अहवाल जून-२०१९ ला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेला सादर केला होता. मागील वर्षाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्ताराच्या कामगिरीवर अधारित हे मानांकन विद्यापीठास मिळाले आहे. विद्यापीठाचा कृषी शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे.

विद्यापीठास सरदार वल्लभभाई पटेल सर्वोकृष्ट कृषी विद्यापीठ पुरस्कार (२००२), देशातील उत्कृष्ट संस्था म्हणून १०० कोटी रुपयांचे विशेष पारीतोषिक (२००८) आणि देशातील सर्वात पसंतीची संस्था (२००९) या सारख्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 

संशोधनात विद्यापीठाचे योगदान मोलाचे असून गेल्या ५० वर्षांमध्ये अन्नधान्य, फळेफुले, चारापिके यांचे २६३ हून अधिक वाण विकसित केले असून मृद व जलसंधारण, पीक लागवड पध्दती, खते आणि पाणी व्यवस्थापन, रोग वकिडींचे नियंत्रण, अवजारे, हरितगृहातील शेती, प्रक्रिया, दुग्धशास्त्र इ. याविषयी सखोल संशोधन करून १५१२ हून अधिक महत्त्वपूर्ण शिफारशी प्रसारित करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने पेरणी, रोप लावणी, आंतर मशागत आणि काढणीसाठी विविध प्रकारचे ३६ सुधारित यंत्रे व अवजारे विकसित केले आहेत.

राहुरी विद्यापीठाचा मानांकनाचा    अहवाल बनविण्यामध्ये कुलसचिव श्री. सोपान कासार, नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, विद्यापीठाचे नोडल ऑफिसर डॉ. मिलिंद अहिरे आदींनी परिश्रम घेतले.


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...