agriculture news in marathi Mahatma Phule Agriculture university starts online training from today | Agrowon

महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन प्रशिक्षण

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

‘डिजिटल विपणन शास्त्राची मूलभूत तत्त्वे’ या विषयावर मंगळवार (ता. ७) ते शनिवार (ता.११) याकालावधीत ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याचे नियोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठात करण्यात आले आहे.  

नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कामकाजावरही काहीसा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. मात्र विद्यापीठाने ऑनलाइन कामकाज सुरु ठेवण्यावर भर दिला आहे. ‘डिजिटल विपणन शास्त्राची मूलभूत तत्त्वे’ या विषयावर मंगळवार (ता. ७) ते शनिवार (ता.११) याकालावधीत ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याचे नियोजन विद्यापीठात करण्यात आले आहे.  

जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ते बंद असल्याने येथील प्रशिक्षणाला अडचण आली. मात्र या प्रकल्पांतर्गत डिजिटल विपणन शास्त्राची मूलभूत तत्त्वे  या विषयावर एका आठवड्याचे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याचे नियोजन केले आहे. त्याला आजपासून सुरवात होत आहे. हे प्रशिक्षण विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकरिता आयोजित करण्यात आले आहे.

घरबसल्या ऑनलाइन पद्धतीद्वारे हे प्रशिक्षण घेता येणार आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, डिजिटल मार्केटिंगसाठी सोशल मिडीयाचा (सामाजिक माध्यमे) वापर, ई-मार्केटिंग, मार्केटिंगसाठी गुगल, युट्युबचा वापर या विषयांचा समावेश असल्याचे  प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे यांनी सांगितले.  लॉकडाऊनच्या काळात महात्मा फुले कृषी विद्यापीठ विविध शिक्षण उपक्रमांमध्ये ऑनलाइन पद्धतीचा वापर करत आहे.


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...