महाविकास आघाडी सरकार ७० हजार रिक्‍त पदे भरणार

Mahavikas Aghadi government will fill 3,000 vacant posts
Mahavikas Aghadi government will fill 3,000 vacant posts

मुंबई ः महाविकास आघाडी सरकारने विविध विभागांतील तब्बल ७० हजार रिक्‍त पदांची महाभरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. २९) यावर चर्चा झाली असून, सर्व विभागांतील रिक्‍त पदांचा आढावा घेण्यात आला आहे. ग्रामविकास, गृह, कृषी, पशू व दुग्धसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्‍त पदे असल्याने तातडीने महाभरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी केली.

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने ७२ हजार रिक्‍त पदांच्या मेगाभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. पहिल्या टप्प्यात ३६ हजार पदे भरण्यात येणार होती. मात्र, लोकसभेची आचारसंहिता लागल्याने ही मेगाभरती प्रक्रिया थांबली होती.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत रिक्‍त पदांबाबत चर्चा झाली. सर्वच विभागांच्या मंत्र्यांनी आपापल्या विभागातील रिक्‍त पदांबाबत चिंता व्यक्‍त केली. स्थानिक पातळीवर हजारो पदे रिक्‍त असल्याने प्रशासनावर प्रचंड भार असल्याने कामे रेंगाळत असल्याची खंत मंत्र्यांनी व्यक्‍त केली. ही रिक्‍त पदे तातडीने भरण्यासाठीचा कार्यक्रम सरकारने हाती घ्यायला हवा, यावर सर्वच मंत्र्यांचे एकमत झाले. लवकरच या महाभरतीच्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करून प्रक्रिया सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

त्यानुसार प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील वर्ग-१ व २ यांच्यासहीत तृतीय व चतुर्थ श्रेणीतील रिक्‍त पदांचा आढावा जाहीर करावा. अशा सूचनाही देण्यात आल्या.

रिक्‍त जागांची स्थिती 
ग्रामविकास विभाग ११००० 
गृह विभाग ७१११ 
कृषी विभाग २५०० 
पदुम १०४७ 
सार्वजनिक बांधकाम ८३३० 
जलसंपदा ८२२० 
जलसंधारण  २४३३
नगरविकास १५०० 
आरोग्य १०,५६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com