जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ची टक्कर

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतमहाविकास आघाडीच्या ‘सहकार’ पॅनेलमधून उमेदवारी न मिळालेले नाराज, तसेच भाजपमधील काही नाराज उमेदवारांनी सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ पॅनेलची स्थापना केली आहे.
महाविकासच्या ‘सहकार’ला सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ची टक्कर
महाविकासच्या ‘सहकार’ला सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ची टक्कर

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या ‘सहकार’ पॅनेलमधून उमेदवारी न मिळालेले नाराज, तसेच भाजपमधील काही नाराज उमेदवारांनी सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ पॅनेलची स्थापना केली आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत या दोन्ही पॅनेलमध्ये चुरस बघावयास मिळणार आहे. दरम्यान, सहकार पॅनेलला ‘कपबशी’, तर शेतकरी विकास पॅनेलला ‘मोटारगाडी’ हे चिन्ह मिळाले आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीची कागदावरची रणधुमाळी संपली असून, आता थेट मतदारांमध्ये जाऊन आपले भाग्य आजमावण्याची लढत रंगणार आहे. महाविकास आघाडीतर्फे सहकार पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे. या पॅनलचे उमेदवार असे : अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघ : श्‍यामकांत बळिराम सोनवणे (शिवसेना), वि.जा.भ.ज.- मेहताबसिंग रामसिंग नाईक (राष्ट्रवादी), इतर मागासवर्ग- डॉ. सतीश भास्करराव पाटील (राष्ट्रवादी), महिला राखीव- ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर (राष्ट्रवादी), शैलजादेवी दिलीप निकम (काँग्रेस), इतर संस्था मतदारसंघ- गुलाबराव बाबूराव देवकर (राष्ट्रवादी), रावेर विकासो- जनाबाई गोंडू महाजन (काँग्रेस), यावल विकासो- विनोदकुमार पंडितराव पाटील (काँग्रेस), चोपडा विकासो- घनश्‍याम ओंकारदास अग्रवाल(राष्ट्रवादी). सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेल भाजपसहित सर्वच पक्षांमधील नाराज उमेदवारांनी ‘शेतकर विकास पॅनेल’ची स्थापना केली आहे. त्यांचे उमेदवार असे : अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ- ज्ञानदेव भगवान बाविस्कर (राष्ट्रवादी), वि.जा.भ.ज.- विकास ज्ञानेश्‍वर वाघ (राष्ट्रवादी), इतर मागास प्रवर्ग- विकास मुरलीधर पवार (राष्ट्रवादी), महिला राखीव- कल्पना शांताराम पाटील (राष्ट्रवादी), अरुणा दिलीपराव पाटील (काँग्रेस), इतर संस्था- रवींद्र सूर्यभान पाटील (भाजप), रावेर विकासो- राजीव रघुनाथ पाटील (काँग्रेस), चोपडा विकासो- सुरेश श्यामराव पाटील (काँग्रेस). भाजप आमदार मात्र स्वतंत्र भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे; परंतु भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची उमेदवारी कायम आहे. भाजपसहित नाराज असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांचे शेतकरी विकास पॅनेल स्थापन करण्यात आले असले, तरी भाजपचे श्री. सावकारे मात्र या पॅनेलमध्ये नाहीत. ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत असून, त्यांचे निवडणूक चिन्ह ‘विमान’ आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com