agriculture news in marathi Mahavikas Sahakar panel will clash with all-party Shetkari Panel In Jalgaon | Page 2 ||| Agrowon

जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ची टक्कर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ‘सहकार’ पॅनेलमधून उमेदवारी न मिळालेले नाराज, तसेच भाजपमधील काही नाराज उमेदवारांनी सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ पॅनेलची स्थापना केली आहे.

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या ‘सहकार’ पॅनेलमधून उमेदवारी न मिळालेले नाराज, तसेच भाजपमधील काही नाराज उमेदवारांनी सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ पॅनेलची स्थापना केली आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत या दोन्ही पॅनेलमध्ये चुरस बघावयास मिळणार आहे. दरम्यान, सहकार पॅनेलला ‘कपबशी’, तर शेतकरी विकास पॅनेलला ‘मोटारगाडी’ हे चिन्ह मिळाले आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीची कागदावरची रणधुमाळी संपली असून, आता थेट मतदारांमध्ये जाऊन आपले भाग्य आजमावण्याची लढत रंगणार आहे. महाविकास आघाडीतर्फे सहकार पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे. या पॅनलचे उमेदवार असे : अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघ : श्‍यामकांत बळिराम सोनवणे (शिवसेना), वि.जा.भ.ज.- मेहताबसिंग रामसिंग नाईक (राष्ट्रवादी), इतर मागासवर्ग- डॉ. सतीश भास्करराव पाटील (राष्ट्रवादी), महिला राखीव- ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर (राष्ट्रवादी), शैलजादेवी दिलीप निकम (काँग्रेस), इतर संस्था मतदारसंघ- गुलाबराव बाबूराव देवकर (राष्ट्रवादी), रावेर विकासो- जनाबाई गोंडू महाजन (काँग्रेस), यावल विकासो- विनोदकुमार पंडितराव पाटील (काँग्रेस), चोपडा विकासो- घनश्‍याम ओंकारदास अग्रवाल(राष्ट्रवादी).

सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेल
भाजपसहित सर्वच पक्षांमधील नाराज उमेदवारांनी ‘शेतकर विकास पॅनेल’ची स्थापना केली आहे. त्यांचे उमेदवार असे : अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ- ज्ञानदेव भगवान बाविस्कर (राष्ट्रवादी), वि.जा.भ.ज.- विकास ज्ञानेश्‍वर वाघ (राष्ट्रवादी), इतर मागास प्रवर्ग- विकास मुरलीधर पवार (राष्ट्रवादी), महिला राखीव- कल्पना शांताराम पाटील (राष्ट्रवादी), अरुणा दिलीपराव पाटील (काँग्रेस), इतर संस्था- रवींद्र सूर्यभान पाटील (भाजप), रावेर विकासो- राजीव रघुनाथ पाटील (काँग्रेस), चोपडा विकासो- सुरेश श्यामराव पाटील (काँग्रेस).

भाजप आमदार मात्र स्वतंत्र
भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे; परंतु भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची उमेदवारी कायम आहे. भाजपसहित नाराज असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांचे शेतकरी विकास पॅनेल स्थापन करण्यात आले असले, तरी भाजपचे श्री. सावकारे मात्र या पॅनेलमध्ये नाहीत. ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत असून, त्यांचे निवडणूक चिन्ह ‘विमान’ आहे. 


इतर ताज्या घडामोडी
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...