agriculture news in marathi, 'Mahavitaran's electricity bills will soon be centered | Agrowon

‘महावितरण’च्या वीजबिलांचे लवकरच होणार केंद्रीकरण

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सोलापूर : राज्यातील अडीच कोटीपेक्षा अधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबिल मिळावे. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा. यासाठी वीजबिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्याच्या प्रक्रियेस सुरवातही झाली आहे.

सोलापूर : राज्यातील अडीच कोटीपेक्षा अधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबिल मिळावे. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा. यासाठी वीजबिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्याच्या प्रक्रियेस सुरवातही झाली आहे.

देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पद्धतीचा नावीन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत आहे. यामुळे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. महावितरणच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीजबिलांची छपाईपासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः सात ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. ग्राहकांना वेळेत वीजबिल न मिळाल्यामुळे त्वरित बिल भरण्याकरिता महावितरणकडून देण्यात येणारी सूट (प्रॉम्टपेमेंट डिस्काऊंट) मिळत नाही. याशिवाय वेगवेगळ्या एजन्सींद्वारे वीजबिलांची छपाई व वितरण होत असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते.

मोबाईल मीटर रीडिंग ॲपमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाइम) मीटर वाचन तसेच चेक रीडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत जलद व दैनंदिन पद्धतीने बिलावरची संपूर्ण प्रक्रिया होईल. या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जास्तीत जास्त अचूक बिल मिळणार आहे. तसेच केंद्रातील रांगा कमी होऊन ते भरणे अधिक सोयीचे होईल.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...