राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत महायुती, आघाडीला संमिश्र यश
नांदेड : विधानसभा निवडणुकीत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत भाजपला, शिवसेनेला, काँग्रेसला, राष्ट्रवादीला, शेकापला जागा मिळाली. नांदेड जिल्ह्यातील नऊपैकी काँग्रेसला ४, राष्ट्रवादीला ०, भाजपला ३, शिवसेनेला १, शेकापला १ जागा मिळाली. परभणी जिल्ह्यातील चार पैकी काँग्रेस, रासप, शिवसेना, भाजप या पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली. हिंगोली जिल्ह्यातील तीनपैकी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या भोकर मतदारसंघात काँग्रेसचे अशोक चव्हाण सुरवातीपासून आघाडीवर होते.
नांदेड : विधानसभा निवडणुकीत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत भाजपला, शिवसेनेला, काँग्रेसला, राष्ट्रवादीला, शेकापला जागा मिळाली. नांदेड जिल्ह्यातील नऊपैकी काँग्रेसला ४, राष्ट्रवादीला ०, भाजपला ३, शिवसेनेला १, शेकापला १ जागा मिळाली. परभणी जिल्ह्यातील चार पैकी काँग्रेस, रासप, शिवसेना, भाजप या पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली. हिंगोली जिल्ह्यातील तीनपैकी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या भोकर मतदारसंघात काँग्रेसचे अशोक चव्हाण सुरवातीपासून आघाडीवर होते. चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचे श्रीनिवास गोरठेकर यांचा ८० हजारांवर मतांनी पराभव केला.
या तीन जिल्ह्यांतील १६ विधानसभा मतदारसंघांत २२० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गुरुवारी (ता. २४) सकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. नांदेड जिल्ह्यात आठ मतदारसंघांत महायुती आणि महाआघाडी यांच्यात लढत झाली. लोहा मतदारसंघात शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यात लढत झाली.
जिंतूर मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात, परभणीत शिवसेना आणि एमआयएम यांच्यात, गंगाखेडमध्ये रासप आणि शिवसेनेत, पाथरीत काँग्रेस आणि भाजप उमेदवारात लढत झाली. परभणी जिल्ह्यात पाथरीचे आमदार मोहन फड, गंगाखेडचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांचा पराभव झाला. विजय भांबळे पराभवाच्या उंबरठ्यावर होते. हिंगोलीमध्ये भाजप आणि ग्रेस, कळमनुरीमध्ये शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी, वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये लढत झाली. कळमनुरी मतदारसंघात आमदार डॉ. संतोष टारफे, वसमतमध्ये शिवसेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचा पराभव झाला.
किनवट मतदारसंघात भाजपचे भीमराव केराम विजयी झाले. ते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार प्रदीप नाईक यांचा परभाव केला. हदगाव मतदारसंघात काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर विजयी आले. त्यांनी शिवसेनेचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा पराभव केला.
नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी काँग्रेसचे डी. पी. सावंत यांचा पराभव केला. नांदेड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे मोहन हंबर्डे विजयी झाले. नायगाव मतदारसंघात भाजपचे राजेश पवार यांनी कॉँग्रेसचे आमदार वसंतराव चव्हाण यांचा पराभव केला.
देगलूर मतदारसंघात काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांचा पराभव केला. मुखेड मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांनी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील यांचा पराभव केला.
लोहा मतदारसंघात शेकापचे श्यामसुंदर शिंदे यांचा विजय झाला.
हिंगोली मतदारसंघात भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी काँग्रेसचे भाऊराव पाटील यांचा पराभव केला. कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर यांचा पराभव केला. वसमत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत नवघरे यांनी अपक्ष शिवाजी जाधव यांच्यावर मात केली.
- भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण दमदार विजयी
- हिंगोली जिल्ह्यात दोन विद्यमान आमदार पराभूत
- पाथरीचे आमदार मोहन फड यांचा पराभव
- गंगाखेडचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांचा पराभव
गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची बाजी
जिंतूर मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांचा ३५०० मतांनी पराभव केला. परभणी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी एमआयएमचे अली खान यांचा ८० हजारांवर मतांनी पराभव केला. गंगाखेड मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेचे विशाल कदम यांचा १३ हजारांवर मतांनी पराभव केला. पाथरी मतदारसंघात काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी झाले. त्यांनी भाजपचे आमदार मोहन फड यांचा १४ हजारांवर मतांनी पराभव केला.
- 1 of 579
- ››