सोलापुरात बंडखोरीचा सर्वाधिक फटका महायुतीला

सोलापुरात बंडखोरीचा सर्वाधिक फटका महायुतीला
सोलापुरात बंडखोरीचा सर्वाधिक फटका महायुतीला

सोलापूर : विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत ८० जणांनी ९८ अर्ज दाखल केले आहेत. पण पक्षाच्या उमेदवारीवरून सगळ्याच पक्षात कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये चांगलेच घमासान सुरू आहे. त्याचा सर्वाधिक फटका शिवसेना-भाजप महायुतीला बसणार असल्याचे दिसते आहे. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर सोलापूर, कॉँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य, येथूनच माजी आमदार दिलीप माने आणि माकपचे नरसय्या आडम यांनी उमेदवारी दाखल केला. पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना प्रवेश न मिळाल्याने भालके यांनी राष्ट्रवादीचा पर्याय निवडला. तर म्हेत्रे यांनी स्वगृहीच कॉँग्रेसमध्ये राहणे पसंत केले.

सोलापूर मध्यमधून शिवसेनेकडून उमेदवारी देऊनही परत घेतल्याने नाराज झालेले माजी महापौर महेश कोठे यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. करमाळ्यातही रश्‍मी बागल यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार नारायण पाटील यांचा पत्ता ऐनवेळी कट केला. त्यामुळे त्यांनीही थेट पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देत अपक्ष अर्ज भरला आहे.

बार्शीत आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. युतीच्या वाटपात ही जागा शिवसेनेकडे आहे. पण त्यांच्याविरोधात राजेंद्र राऊत यांनी बंडखोरी केली आहे.

पंढरपुरातही रयत क्रांतीला जागा सोडून तिथे सुधाकर परिचारक यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. माढ्यात बबनराव शिंदे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून कायम राहिले. महायुतीलाच या निवडणुकीत बंडखोरीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com