Agriculture news in marathi; In the Mahayuti for power Factor Parties Initiative | Agrowon

सत्तास्थापनेसाठी महायुतीतील घटक पक्षांचा पुढाकार

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

मुंबई  ः राज्यातील राजकारणाची सद्यस्थिती पाहता आता सत्तास्थापनेसाठी महायुतीतील इतर मित्र पक्षांनी पुढाकार घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागांवर विजय मिळाल्याने भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करावे, अशी मागणी घटक पक्षांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन केली. 

मुंबई  ः राज्यातील राजकारणाची सद्यस्थिती पाहता आता सत्तास्थापनेसाठी महायुतीतील इतर मित्र पक्षांनी पुढाकार घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागांवर विजय मिळाल्याने भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करावे, अशी मागणी घटक पक्षांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन केली. 

या मागणीसाठी घटक पक्षांतील रिपाइंचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, रासपचे नेते महादेव जानकर, राज्यमंत्री अविनाश महातेकर, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत, विनायक मेटे आदी नेत्यांनी शनिवारी (ता. २) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ‘भाजप-शिवसेनेने आपसातील वाद मिटवून लवकरात लवकर राज्यात सत्ता स्थापन करावी’, असे आवाहन या वेळी मंत्री रामदास आठवले यांनी केले. राज्यपालांच्या भेटीनंतर घटक पक्षांचे हे सगळे नेते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी गेले, तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी सत्तास्थापनेबाबत चर्चा केल्याचे समजते. 

शरद पवार, सोनिया गांधींची उद्या भेट
महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सरकार स्थापनेवरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीचीही मोर्चेबांधणी सुरू आहे. काँग्रेसच्या 
राज्यातील नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेतली. तसेच उद्या (ता. ४) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. या भेटीत शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. त्याआधी शरद पवार यांनी शनिवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती.


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...