agriculture news in Marathi Mahila raj in farmers sansad today Maharashtra | Agrowon

शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

शेतकऱ्यांच्या वतीने जंतरमंतरवर आयोजित केल्या जाणाऱ्या शेतकरी संसदेत सोमवारी (ता. २६) सर्व कामकाज महिलाच सांभाळणार आहेत.

नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने जंतरमंतरवर आयोजित केल्या जाणाऱ्या शेतकरी संसदेत सोमवारी (ता. २६) सर्व कामकाज महिलाच सांभाळणार आहेत. शेतकरी संसदेतील हा आगळावेगळा टप्पा ठरेल. 

केंद्राने निवडक म्हणजे रोज २०० शेतकऱ्यांना जंतरमंतर येथे येण्यास सशर्त परवानगी दिल्यावर २२ व २३ जुलै रोजी शेतकऱ्यांनी प्रतिरूप संसदेचे आयोजन केले. पहिले दोन दिवस बाजार समिती वटहुकमावर चर्चा झाली. योगेंद्र यादव, शिवकुमार कक्काडी व हनन मौला यांनी सभापती म्हणून या संसदेत काम पाहत आहेत. दरम्यान, शनिवारी या संसदेत गदारोळ झाला व शेतकऱ्यांचे कृषिमंत्री म्हणून निवडले गेलेले रवनीतसिंग बराड विरोधकांच्या आरोपांना समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी शेतकऱ्यांना मवाली म्हटल्याबद्दल त्यांच्या निषेधाचा जो ठराव केला गेला त्यातही महिलांच्या बाबत आक्षेपार्ह भाषा कोठेही येणार नाही, याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली. 

रोज २०० शेतकरी पोलिसांच्या अटी पाळून सीमेवरून सकाळी येतात व संध्याकाळी पोलिसांच्या बससेमधून परत सीमांवर जातात. पूर्ण अहिंसात्मक मार्गाने शेतकरी ही संसद आयोजित करत आहेत. यात आजचा दिवस वेगळा ठरणार आहे. कारण त्या दिवशी अभिरूप संसदेचे सर्व कामकाज महिला शेतकरी आंदोलक सांभाळणार आहेत. 

दरम्यान, शेतकरी आंदोलनाचे ध्येय राजकारणात पडण्याचे नाही, याचा पुनरुच्चार भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे. दिल्ली-जयपूर महामार्गावरील खेडा सीमेवर आयोजित कार्यक्रमात बोलताना टिकैत म्हणाले, की सरकार आपल्या ताठर भूमिकेतून बाहेर येत नाही तोवर सीमांवरील आंदोलन चालेल. शेतकरी नेते गुरूनामसिंग चढुनी यांना सक्रिय राजकारणात उतरायची इच्छा असल्याने त्यांनी संयुक्त किसान मोर्चापासून दूर राहण्याचे धोरण ठेवले आहे. मात्र लवकरच त्यांचे गैरसमज दूर होतील व ते आंदोलनात पुन्हा सक्रिय होतील अशीही आशा टिकैत यांनी व्यक्त केली. 

तर शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ 
हे आंदोलन किमान ३५-३६ महिने तरी चालेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. टिकैत म्हणाले, की पुन्हा चर्चा सुरू करण्यासाठी सरकारने अटी ठेवल्या आहेत. मात्र तीनही कायदे रद्द करणे या पलीकडे शेतकरी काहीही मान्य करणार नाहीत. सरकारला शेतकऱ्यांची ताकद पाहायची असेल, तर दिल्लीत पुन्हा ५ लाख ट्रॅक्टरचा मोर्चा निघेल, असाही त्यांनी इशारा दिला. 


इतर अॅग्रो विशेष
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...