‘कडकनाथ’ प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते न्यायालयात हजर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

इस्लामपूर, जि. सांगली  ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार व रयत अ‍ॅग्रो कंपनीचे सर्वेसर्वा सुधीर मोहिते (रा. मोहिते वडगाव, ता. कडेगाव) बुधवारी (ता. २३) इस्लामपूर न्यायालयात स्वतःहून हजर झाले. त्यांना न्यायालयाने पोलिसांच्या ताब्यात दिले. 

कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला कडकनाथ कोंबडी घोटाळा चार महिन्यांपूर्वी उघडकीस आला. या घोटाळ्यात महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी गुंतवणुकीत लाखो रुपये कमवण्याचे अामिष दाखवण्यात आले होेते. यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ व आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांनी या कंपनीत गुंतवणूक करत कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला होता. प्रारंभी गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांना कंपनीने ठरलेल्या कराराप्रमाणे योग्य परतावा दिला. मात्र त्यानंतर या कंपनीकडून दिलेली कोणतीही आश्‍वासने पाळण्यात आली नाहीत.

कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीची इस्लामपूर, कोल्हापूर, पुणे, सातारा या ठिकाणची कार्यालये रात्रीत बंद करून पोबारा केला. संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींवरून सुधीर मोहिते, संदीप मोहिते, गणेश शेवाळे यांच्यावर गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झाल्यानंतर संदीप मोहिते, गणेश शेवाळे यांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. मात्र मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते गुन्हे दाखल झाल्यापासून फरारी होते. ते बुधवारी इस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात स्वतःहून हजर झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com