agriculture news in marathi Mainly their will be no rain today | Page 2 ||| Agrowon

राज्यात पावसाच्या उघडिपीची शक्यता

वृत्तसेवा
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

आज (ता. १७) कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात मुख्यत: उघडीप राहण्यासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. १७) कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात मुख्यत: उघडीप राहण्यासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा चार ते पाच दिवस दक्षिणेकडे कायम राहणार असून, सध्या द्वारका, अहमदाबाद ठळक कमी दाब क्षेत्रातून बलसोर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून गुजरात, राजस्थान ते ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

राज्यात पाऊस ओसरला असून, अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. दिवसभर असलेल्या स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, विदर्भात अनेर ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

  • कोकण : जव्हार, शहापूर प्रत्येकी २०, चिपळूण, दोडामार्ग, कणकवली, पनवेल, पालघर, वैभववाडी, वेंगुर्ला प्रत्येकी १०.
  • मध्य महाराष्ट्र : एरंडोल ३०, इगतपुरी २०, चंदगड, दहिगाव, गगनबावडा, महाबळेश्‍वर, पन्हाळा, पेठ प्रत्येकी १०.
  • मराठवाडा : मंथा २०, औंढा नागनाथ, हिंगोली, प्रत्येकी १०.
  • विदर्भ : भामरागड ७०, चिखलदरा ४०, अमगाव, आष्टी, चिमूर, एटापल्ली, घाटंजी, गोरेगाव, काटोल, कोर्ची, कुरखेडा, लाखनी प्रत्येकी १०.

मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र
उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, दोन ते तीन दिवसांत ही प्रणाली विरून जाण्याची शक्यता आहे. गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. म्यानमारच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, शनिवारपर्यंत ही प्रणाली ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत.


इतर अॅग्रो विशेष
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
खानदेशात केळीला ११८० रुपये दरजळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत....
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार :... मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या...
दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने...नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने...
योग्य व्यवस्थापनातून वाढविला १९०...गोठा, म्हशींचे संगोपन व दूध विक्री या स्तरांवर...
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...