Agriculture news in marathi Maintain the decision of the Sarpanch directly from the public | Agrowon

'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम ठेवा'

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय रद्द करून सदस्यांतून सरपंच निवड करण्यासाठी घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे, तो तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. सरपंच परिषदेने सोलापुरात नुकतेच मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन देऊन ही मागणी केली. 

सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय रद्द करून सदस्यांतून सरपंच निवड करण्यासाठी घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे, तो तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. सरपंच परिषदेने सोलापुरात नुकतेच मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन देऊन ही मागणी केली. 

सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढून सरकारच्या या एकतर्फी निर्णयाचा निषेध करण्यात आला. सात रस्ता चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी दत्ता काकडे यांनी सांगितले, की सरपंच व लोकभावना ही थेट जनतेतून सरपंच निवडीच्या बाजूने आहे. राज्यात त्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जातो आहे, शासनाने याचा विचार करावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू. आमची मागणी, त्यामागचा उद्देश लक्षात घ्या, हीच आमची अपेक्षा आहे.

सरचिटणीस ॲड. जाधव म्हणाले, "सरकारने निर्णयाआधी काहीच विचार केला नाही, अत्यंत घाईगडबडीत हा निर्णय घेतला गेला.'' या वेळी जिल्हा अध्यक्ष अदिनाथ देशमुख, महिलाध्यक्ष कविता घोडके-पाटील, सतीश नीळ, किशोर पाटील, अमोल दुरंदे, विक्रांत काकडे, पंडित मिरगणे, स्मिता पाटील, काका फफाळ, विकास माने, यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख सरपंच, उपसरपंच बहुसंख्येने उपस्थित होते. 


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...