महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३ कामे पूर्ण

महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३ कामे पूर्ण
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३ कामे पूर्ण

‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसूत्री मोहिमेतील ‘एक गाव-एक दिवस’ या ‘महावितरण’च्या उपक्रमातून जिल्ह्यात ६० गावांमध्ये नऊ हजार ३३ विविध कामे करण्यात आली आहेत. 

‘एक गाव-एक दिवस’ या उपक्रमातून बारामती परिमंडल कार्यक्षेत्रातील सातारा, सोलापूर जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांत १४२ गावांत एकूण १२ हजार २७८ कामे केली आहेत. त्यामध्ये वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे नऊ हजार ९१९ कामे, वीजबिल व वीजमीटरसंदर्भातील दोन हजार १७७ तक्रारींचे निवारण व १८२ नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत साताऱ्यातील पाच, कऱ्हाडमधील दहा, फलटणमधील १२, वडूजमधील १८ व वाई विभागामधील १५ गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. या ६० गावांमध्ये वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे एकूण सात हजार ६२७ कामे करण्यात आली. 

यामध्ये रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीज खांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सुलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्युशन बॉक्‍सचे क्‍लिनिंग व आवश्‍यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. 

याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ती उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची एक हजार ३१९ कामे करण्यात आली, तर आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ८७ ग्राहकांना जागेवरच नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. 

मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता पूनम रोकडे, कार्यकारी अभियंता उदय कुलकर्णी (प्रशासन), सतीश राजदीप (फलटण), सुनीलकुमार माने (सातारा), संजय सोनवलकर (वाई), अभिमन्यू राख (कऱ्हाड), अरविंद यादव (वडूज) तसेच उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह शेकडो जनमित्र या उपक्रमात सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com