दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
खानदेशात मका, ज्वारीला हमीभाव मिळेना
जळगाव : खानदेशात ज्वारी, मक्याची आवक बाजारात सुरू आहे. परंतु हमीभावात ज्वारी, मक्याची खरेदी सुरू नाही.
जळगाव : खानदेशात ज्वारी, मक्याची आवक बाजारात सुरू आहे. परंतु हमीभावात ज्वारी, मक्याची खरेदी सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात कमी दरात त्याची विक्री करावी लागत आहे. शासकीय खरेदीही वेगात सुरू नाही. यामुळे दर कमी मिळत आहेत. क्विंटलमागे तब्बल ६०० ते ८५० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.
ज्वारी, मक्याची आवक जळगाव, चाळीसगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील दोंडाईचा (ता.शिंदखेडा), शिरपूर येथील बाजारात या आठवड्यात सुरू झाली आहे.
मक्याचा कमाल दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यत आहे. तर, ज्वारीचे दर ९०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. सध्या ज्वारी, मक्याची शिवार खरेदी फारशी नाही. मका, ज्वारी, बाजरी खरेदीची घोषणा झाली. परंतु, जळगाव जिल्ह्यात फक्त धरणगाव, जळगाव, जामनेर येथेच खरेदी सुरू आहे.
अनेक भागात गोदामे व इतर अडचणींमुळे खरेदी बंद आहे. सध्या मक्यात आर्द्रता १९ ते २० टक्के आहे. शासकीय केंद्रांत १४ टक्के आर्द्रतेचा मका खरेदी केला जात आहे. या निकषामुळेदेखील अनेक शेतकरी मक्याची विक्री बाजारात करीत आहेत. ज्वारी, मक्याचे उत्पादन फारसे हाती आलेले नाही. काही शेतकऱ्यांनी दरात सुधारणा होईल, या अपेक्षेने घरात साठवणूक केली होती.
योग्य मार्ग काढण्याची मागणी
मक्याच्या दरात फारशी वाढ दिसत नाही. फक्त मका दरात गेल्या १० ते १२ दिवसात किंचित वाढ झाली आहे. हमीभाव नसल्याने व कवडीमोल दर मिळत असल्याने प्रशासन, बाजार समितीमधील अडतदार, खरेदीदार व शेतकरी यांची बैठक व्हावी. याबाबत योग्य तो मार्ग काढला जावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
- 1 of 1023
- ››