नाशिक जिल्ह्यात आधारभूत भरडधान्य खरेदीतील मका, ज्वारीच्या नोंदी प्रलंबीतच

नाशिक : जिल्ह्यात ८ खरेदी केंद्रांवर आधारभूत भरडधान्य खरेदीत मका व ज्वारी खरेदी करण्यात आली. ज्यामध्ये १ लाख ८९६ क्विंटल मका खरेदी पूर्ण झाली आहे.
 Maize and sorghum procurement of basic coarse grains are pending in Nashik district
Maize and sorghum procurement of basic coarse grains are pending in Nashik district

नाशिक : जिल्ह्यात ८ खरेदी केंद्रांवर आधारभूत भरडधान्य खरेदीत मका व ज्वारी खरेदी करण्यात आली. ज्यामध्ये १ लाख ८९६ क्विंटल मका खरेदी पूर्ण झाली आहे. त्यापैकी पोर्टलवर ९७,२१९ क्विंटल मका खरेदीची नोंदणी पूर्ण झाली. मात्र, ३,६७७ क्विंटल मका खरेदी होऊनही त्याची नोंद पोर्टल बंद झाल्याने होऊ शकलेली नाही. यामुळे पैसे मिळणे तर दूरच; मात्र अद्याप पोर्टलवर नोंदणी न झाल्याने खरेदीची स्थिती अधांतरीच आहे.

याबाबत जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाने पोर्टलवर नोंदणीविना खरेदी केलेला मका नोंदणी करावा, यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यासह जिल्ह्यात शासकीय आधारभूत खरेदीत एकूण ७८७.५० क्विंटल ज्वारी खरेदी झाली आहे. त्यापैकी पोर्टलवर ५१० क्विंटलची नोंद झाली. मात्र, २७७.५० क्विंटल नोंद झालेली नाही. त्यामुळे हा एक वेगळा अडचणीचा मुद्दा ठरत आहे.

अगोदरच अटी, शर्ती असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. भांडवल नसल्याने एकीकडे बँका पीककर्ज वेळेवर देत नसल्याने उसनवारी, सावकारी कर्ज घेऊन काहींनी हंगाम उभा केला. त्यातच पेमेंट देण्यात शासकीय यंत्रणेकडून होत असलेली अडचण डोकेदुखी ठरत आहे. 

अशी आहे स्थिती

धान्य एकूण खरेदी (क्विंटल) पोर्टलवर नोंद पोर्टलवर नोंद बाकी
मका १ लाख ८९६ ९७ हजार २१९ ३ हजार ६७७
ज्वारी  ७८७.५०  ५१०  २७७.५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com