Agriculture news in marathi Maize arrivals in Khandesh markets declined | Agrowon

खानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटली

बुधवार, 7 एप्रिल 2021

खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी वाढली. पण मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी असून, किमान ११०० व कमाल १३०० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. दरवाढीची प्रतीक्षा व कमी लागवड यामुळे बाजारातील आवक कमी होत आहे.

जळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी वाढली. पण मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी असून, किमान ११०० व कमाल १३०० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. दरवाढीची प्रतीक्षा व कमी लागवड यामुळे बाजारातील आवक कमी होत आहे. दरात क्विंटलमागे ८० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत असून, किमान जागेवर १५०० ते १६०० रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

मक्याची लागवड खानदेशात कमी झाली होती. ही लागवड सुमारे ४१ हजार हेक्टरवर झाली आहे. जळगाव जिल्ह्यात ५० ते ५१ हजार हेक्टरवर मका लागवड केली जात होती. पण लष्करी अळीचा प्रकोप, कमी दर, वाढलेला उत्पादन खर्च, मजूर टंचाई आदी कारणांमुळे लागवड कमी झाली. मका मळणी मार्चच्या अखेरीस सुरू झाली. मळणीला वेग आला आहे. यात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी पूर्ण झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा मका पुढील पाच ते सात दिवसांत मळणीवर येईल. बाजारात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी पूर्ण होऊन आवक सुरू झाली होती. पण त्याचे दर ११०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल एवढे  होते.

मक्याची आवक धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, अमळनेर व जळगाव या बाजारात  वाढत होती. पण ही आवक गेल्या चार दिवसांत चोपडा व अमळनेरात घटली आहे. कारण दर कमी मिळत आहेत. मका साठवून ठेवणे शक्य आहे. दरवाढ झाल्यानंतर बाजारात त्याची विक्री करू, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

जळगाव, चोपडा, अमळनेर येथील बाजार मक्यासाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात मक्याची आवक मार्चच्या अखेरीस प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल एवढी होती. पण गेले चार दिवस ही आवक प्रतिदिन सरासरी १६०० क्विंटल, एवढी झाली आहे. दर टिकून असून, प्रतिक्विंटल कमाल १३०० रुपये दर आहे. यंदा लागवड कमी झाली आहे.

उत्पादन एकरी किमान २५०० ते २८०० क्विंटल एवढे येत आहे. काही शेतकरी यापेक्षा अधिक उत्पादन घेत आहेत. पण उत्पादन खर्च एकरी किमान १३ ते १४ हजार रुपये एवढा आला आहे. त्यात अनेकांना वीजबिल भरावे लागले असून, हा खर्चही वाढला आहे. यामुळे शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत आहेत.

टॅग्स

इतर बाजारभाव बातम्या
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
खानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटलीजळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी...
औरंगाबादेत आंबा खातोय भाव, ज्वारीचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये कारले, हिरव्या मिरचीच्या दरात...नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, भेंडी...सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नाशिकमध्ये लेट खरीप कांद्याची आवक वाढलीनाशिक : जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड...
सोयाबीनला उच्चांकी सहा हजारांचा भावलातूर/अकोला ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात...
पुण्यात लिंबू, संत्र्यांची मागणी, दर...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबाव वाढण्यास...जळगाव : देशातील विविध भागांत टाळेबंदी,...
सोलापुरात बेदाण्याला कमाल २५१ रुपये दरसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीत हलकी घटनागपूर ः विदर्भात सर्वदूर देशांतर्गत मागणी...
खानदेशात बाजारात मका दर स्थिरजळगाव ः खानदेशात बाजारात मक्याची आवक वाढली आहे....
नाशिकमध्ये आंबा प्रतिक्विंटल २५ हजार...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात खरबूज ५०० ते २००० रुपयेअकोल्यात क्विंटलला १००० ते १८०० रुपये अकोलाः...
खानदेशात काबुली हरभऱ्याच्या दरात सुधारणाजळगाव  ः  खानदेशात या आठवड्यात बाजार...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...