Agriculture news in marathi Maize can be cultivated on 90,000 hectares in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार हेक्टरवर लागवड शक्य

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा सुमारे २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मूग, उडदाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात पूर्वमशागत सुरू आहे.

जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा सुमारे २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मूग, उडदाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात पूर्वमशागत सुरू आहे. कोरडवाहू पिकांची लवकरच पेरणी करण्याचे नियोजन काही शेतकरी करीत आहेत. रब्बीसाठी अनुकूल वातावरण खानदेशातील तापी, गिरणा, पांझरा, अनेर, गोमाई नदीकाठी आहे. कोरडवाहू क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी वाढणार आहे. याच वेळी जळगाव जिल्ह्यात मक्याची गेल्या वर्षाच्या तुलनेत १० ते १२ हजार हेक्टर अधिक म्हणजेच सुमारे ९० ते ९१ हजार हेक्टरवर लागवड शक्य आहे. 

कृत्रीम जलसाठे उपलब्ध असलेले शेतकरी मक्याची लागवड अधिक करतील. कारण, मक्याचा हमीभाव १८५० रुपये प्रतिक्विंटल आहे. बाजरी, गहू या शेतमालास बाजार समितीत दर कमी आहेत. शासन गहू, बाजरीची हमीभावात खरेदी करीत नाही. तर, कोरडवाहू क्षेत्रात हरभरा व त्यापाठोपाठ ज्वारीची पेरणी होईल.

हरभऱ्याची सुमारे ८० ते ८५ हजार हेक्टरवर पेरणी शक्य आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन लाख ७५ ते ८० हजार हेक्टरवर रब्बी हंगाम उभा राहील. तर, खानदेशात मिळून सुमारे साडेचार लाख हेक्टर किंवा त्यापेक्षा थोड्या अधिक क्षेत्रात रब्बी हंगाम असणार आहे.  ज्वारीसाठी खानदेशात तापी नदीकाठावरील भाग प्रसिद्ध आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात कोरडवाहू ज्वारी किंवा दादरची पेरणी केली जाते. धुळ्यात सुमारे सव्वालाख आणि नंदुरबारातही एक लाख ते सव्वालाख हेक्टरवर रब्बी हंगाम उभा राहू शकतो. 

हरभऱ्याची पेरणी खानदेशात मिळून सुमारे दीड लाख ते एक लाख ७० हजार हेक्टरवर होऊ शकते. उडदाची मळणी जवळपास पूर्ण झाली आहे. या क्षेत्रात पूर्वमशागत करून त्यात रब्बी पिकांची पेरणी केली जाईल. तर, सोयाबीन पिकाखाली रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रातही पेरणी सुरू होईल. ऑक्टोबरअखेर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अधिक दिसेल. तर, डिसेंबरमध्ये पूर्वहंगामी कापूस पिकाखालील क्षेत्र रिकामे होण्यास सुरवात होईल. त्यात मका लागवडीचे नियोजन अनेक कृत्रिम जलसाठाधारक शेतकरी करीत आहेत. 

ज्वारी, हरभऱ्याची पेरणी यंदा कोरडवाहू क्षेत्रात बऱ्यापैकी होईल. परंतु, कृत्रीम जलसाठे उपलब्ध असलेले शेतकरी मका पिकाकडे वळतील. कारण, मक्याचे दर सुधारू लागले आहेत. बाजरी, गव्हाचे दर गेले सात-आठ महिने बाजारात कमीच आहेत. बाजरी, गव्हाची खरेदी शासन करीत नाही. यामुळे मका पिकाकडे शेतकरी वळतील. 
- रमेश पाटील, शेतकरी, पाचोरा, (जि.जळगाव)


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...