agriculture news in Marathi, Maize crop in Karnataka, Maharashtra seen hit by heavy rains, Maharashtra | Agrowon

पुरामुळे मका पिकाला फटका
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका उत्पादक पट्ट्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने तब्बल १० दिवस थैमान घातले. यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये तब्बल १८ लाखांपेक्षा अधिक क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका उत्पादक पट्ट्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने तब्बल १० दिवस थैमान घातले. यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये तब्बल १८ लाखांपेक्षा अधिक क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

कर्नाटक हे खरीप मका उत्पादनात अग्रेसर राज्य आहे, तर महाराष्ट्रातही मका मोठ्या प्रमाणात घेतला जातो. चालू खरीप हंगामात कर्नाटकातील शेतकऱ्यांनी १० लाख हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर मक्याची लागवड केली आहे. तर, महाराष्ट्रात ८ लाख २४ हजार हेक्टरवर मका पीक आहे, अशी माहिती राज्यांच्या कृषी विभागाने दिली. कर्नाटकात तब्बल दीड लाख हेक्टरपर्यंत मका पिकाचे नुकसान झाले आहे. यात बागलकोट, रायचूर, दक्षिण कन्नाडा, उत्तर कन्नाडा आणि शिवमोग्गा या जिल्ह्यांमध्ये नुकसानीची पातळी अधिक आहे.

‘‘आम्ही सध्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत असून, प्रभावित क्षेत्र निश्‍चित करीत आहोत. त्यानंतर किती फटका बसला, हे सांगता येईल. सध्या अनेक भागांत पुराचे पाणी कायम असल्याने आम्ही पाणी कमी होण्याची वाट पाहत आहोत. पाणी कमी झाल्यानंतर आम्हाला प्रभावित भागात जाता येईल आणि अचूक सर्व्हे आणि पीक नुकसानीची पाहणी करता येईल,’’ अशी माहिती कर्नाटक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. येथे सध्या मका पीक हे फुलांच्या अवस्थेत आहे. त्यामुळे पावसाचा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याच भागात मका पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात प्रामुख्याने सांगली, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मोठा फटका बसला आहे. 

मध्य महाराष्ट्रात  निम्मे पीक गेले
महाराष्ट्राच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सांगली, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. परंतु, मागील काही दिवसांमध्ये आलेल्या पुरामुळे येथील पीक धोक्यात आले आहे. सांगली, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील जवळपास निम्मे पीक हातचे गेले आहे. राज्यात ८ लाख २४ हजार हेक्टरवर मका पीक लागवड झाली. त्यात नाशिक जिल्ह्यात दोन लाख ९ हजार ८५९ हेक्टर, सांगली जिल्ह्यात ३५ हजार हेक्टर आणि कोल्हापूर जिल्ह्यात ११ हजार ७८१ हेक्टरवर लागवड झाली होती.

कर्नाटकात सात लाख हेक्टर पिकांचे नुकसान
कर्नाटकमधील कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. तसेच, नद्यांना आलेल्या पुरामुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात पुरामुळे जवळपास २०० लोकांना आपला जीव गमवावा लागला असून, अनेक लोक बेघर झाले. तर, तब्बल सात लाख हेक्टरवरील म्हणजेच राज्यातील एकूण पेरा झालेल्या क्षेत्राच्या १० टक्के शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यात मका पिकाचे जवळपास एक ते दीड लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...