agriculture news in Marathi, Maize crop in Karnataka, Maharashtra seen hit by heavy rains, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुरामुळे मका पिकाला फटका
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका उत्पादक पट्ट्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने तब्बल १० दिवस थैमान घातले. यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये तब्बल १८ लाखांपेक्षा अधिक क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका उत्पादक पट्ट्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने तब्बल १० दिवस थैमान घातले. यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये तब्बल १८ लाखांपेक्षा अधिक क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

कर्नाटक हे खरीप मका उत्पादनात अग्रेसर राज्य आहे, तर महाराष्ट्रातही मका मोठ्या प्रमाणात घेतला जातो. चालू खरीप हंगामात कर्नाटकातील शेतकऱ्यांनी १० लाख हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर मक्याची लागवड केली आहे. तर, महाराष्ट्रात ८ लाख २४ हजार हेक्टरवर मका पीक आहे, अशी माहिती राज्यांच्या कृषी विभागाने दिली. कर्नाटकात तब्बल दीड लाख हेक्टरपर्यंत मका पिकाचे नुकसान झाले आहे. यात बागलकोट, रायचूर, दक्षिण कन्नाडा, उत्तर कन्नाडा आणि शिवमोग्गा या जिल्ह्यांमध्ये नुकसानीची पातळी अधिक आहे.

‘‘आम्ही सध्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत असून, प्रभावित क्षेत्र निश्‍चित करीत आहोत. त्यानंतर किती फटका बसला, हे सांगता येईल. सध्या अनेक भागांत पुराचे पाणी कायम असल्याने आम्ही पाणी कमी होण्याची वाट पाहत आहोत. पाणी कमी झाल्यानंतर आम्हाला प्रभावित भागात जाता येईल आणि अचूक सर्व्हे आणि पीक नुकसानीची पाहणी करता येईल,’’ अशी माहिती कर्नाटक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. येथे सध्या मका पीक हे फुलांच्या अवस्थेत आहे. त्यामुळे पावसाचा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याच भागात मका पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात प्रामुख्याने सांगली, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मोठा फटका बसला आहे. 

मध्य महाराष्ट्रात  निम्मे पीक गेले
महाराष्ट्राच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सांगली, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. परंतु, मागील काही दिवसांमध्ये आलेल्या पुरामुळे येथील पीक धोक्यात आले आहे. सांगली, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील जवळपास निम्मे पीक हातचे गेले आहे. राज्यात ८ लाख २४ हजार हेक्टरवर मका पीक लागवड झाली. त्यात नाशिक जिल्ह्यात दोन लाख ९ हजार ८५९ हेक्टर, सांगली जिल्ह्यात ३५ हजार हेक्टर आणि कोल्हापूर जिल्ह्यात ११ हजार ७८१ हेक्टरवर लागवड झाली होती.

कर्नाटकात सात लाख हेक्टर पिकांचे नुकसान
कर्नाटकमधील कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. तसेच, नद्यांना आलेल्या पुरामुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात पुरामुळे जवळपास २०० लोकांना आपला जीव गमवावा लागला असून, अनेक लोक बेघर झाले. तर, तब्बल सात लाख हेक्टरवरील म्हणजेच राज्यातील एकूण पेरा झालेल्या क्षेत्राच्या १० टक्के शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यात मका पिकाचे जवळपास एक ते दीड लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
अंगावर काटा येणारच!देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मधुरेमध्ये दाखल...
कामाच्या दर्जात तडजोड न स्वीकारणारा...सर विश्वेश्वरय्या यांच्या कामाची मुहूर्तमेढ धुळे...
कांदा दरवाढीचा कल कायम राहणारपुणे : केंद्र सरकारकृत एमएमटीसी या ट्रेडिंग...
साखर निर्यातीची अधिसूचना अखेर जारीपुणे : देशातील भरमसाठ साखरेचा साठा बघता ६० लाख टन...
जोर काहीसा ओसरला; मंगळवारपासून पावसाची...पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर काहीसा...
पूरस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत...मुंबई: जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट...
दरवर्षी १०० गावे आदर्श करणार ः...पुणे  : राज्याच्या ग्रामविकासाला आदर्श गाव...
‘समृद्धी’साठी २८ हजार कोटींचे कर्ज...मुंबई: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग या...
निर्यातक्षम गुणवत्तेच्या पेरूचे उत्पादनसातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील कृषिभूषण मनोहर...
बुके, हारांसह फूल ‘डेकोरेशन’ झाला सक्षम...नाशिक जिल्ह्याने फूल सजावटीच्या व्यवसायातही आघाडी...
ग्रामपंचायतींना मिळाला कृषी कक्षपुणे : राज्यातील साडेअकरा हजार कृषी सहायकांना...
‘वान’च्या पाणी आरक्षणाला...अकोला  ः जिल्ह्यातील वान प्रकल्पातून अकोला...
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी...सांगली ः पावसाळा संपत आला तरी तासगाव तालुक्याच्या...
संत्रा छाटणीकरिता आता विदेशी सयंत्राचा...नागपूर ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
गटशेती योजना चांगली; पण...रा ज्यातील शेती लहान लहान तुकड्यांमध्ये विभागली...
मराठवाड्यात उसाला पर्याय हवाचयावर्षी मराठवाड्यात पडलेला तुटपुंजा पाऊस, ६६ पैकी...
गडचिरोलीत पूरस्थिती कायम; कोल्हापुरात...नागपूर/कोल्हापूर ः मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम...
एफआरपीच्या व्याजाबाबत साखर आयुक्तालयात...पुणे  : उसाच्या थकीत एफआरपीचे विलंब व्याज...
जोर ओसरला; उत्तर कोकण, उत्तर...पुणे : ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून जवळपास दोन...
तीर्थपुरी गावाची होतेय मोसंबी पिकात ओळखतीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) भागातील...