देशात मक्याची ७५ लाख हेक्टरवर लागवड 

देशात मक्याची ७५ लाख हेक्टरवर लागवड 
देशात मक्याची ७५ लाख हेक्टरवर लागवड 

नवी दिल्ली ः मागील आठवड्यात दक्षिण आणि मध्य भारतातील काही भागात मुसळधार पावसाने कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये खरीप मक्याच्या लागवडीस मदत झाली. खरीप मक्याखालील क्षेत्र आत्तापर्यंत ७.५ दशलक्ष हेक्टरवर पोचले असून मागील वर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी अधिक आहे. तर, संपूर्ण हंगामात आतापर्यंत सर्वसाधारण क्षेत्रा (७.४ दशलक्ष हेक्टर) पेक्षा यंदाची पेरणी क्षेत्र अव्वल ठरले आहे. 

मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब आणि उत्तर प्रदेशात या वर्षी पेरणी जास्त होती. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये खरीप मक्याची प्रमुख उत्पादकांनीही पेरणी केली आहे. कर्नाटक आणि तमिळनाडूमधील पिकांवर अमेरिकन लष्करी अळी (फॉल आर्मीवर्म) अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. असे असतानाही शेतकऱ्यांना पिकांना जास्त मोबदल्याची अपेक्षा आहे, असे कृषिशास्त्रज्ञ म्हणाले. 

सध्या निझामाबादमध्ये मक्याचे दर प्रतिक्विंटल २३५० रुपये आहेत. मागील वर्षी ११०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल होते.यंदा एकूणच मका लागवडीचे क्षेत्र जास्त असणार आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दरापेक्षा चांगले दर मिळण्याची अपेक्षा आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. येत्या काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, पेरणीसाठी त्याची मदत होणार आहे.

देशात २०१९ या वर्षामध्ये मॉन्सूनचा पाऊस दीर्घ कालावधीतील सरासरीच्या ९६ टक्के पडण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पाऊस हा दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या १०० टक्के इतका पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

मागील वर्षीच्या आकडेवारीच्या व टक्केवारीच्या तुलनेत  २०१९ -२० (जुलै-जून) मध्ये बुधवारपर्यंत मका लागवड
राज्य २०१९-२० (हेक्टरमध्ये) २०१८-१९ (हेक्टरमध्ये) झालेले बदल सर्वसाधारण क्षेत्र हंगामी (हेक्टरमध्ये)
आंध्र प्रदेश ८०,००० ९०,००० (-)११.१ ९२,०००
बिहार ३,८८,००० ३,८९,००० (-)०.३ २,५८,०००
छत्तीसगढ २,०८,००० २,२४,००० (-)७.१ १,२०,०००
गुजरात २,९५,००० ३,११,००० (-)५.१ ३,११,०००
कर्नाटक १०,६४,००० १०,८६,००० (-)२.० ११,९९,०००
मध्य प्रदेश १५,४४,००० १३,५९,००० १३.६ ११,३६,०००
महाराष्ट्र ८,३८,००० ७,९२,००० ५.८ ७,५७,०००
राजस्थान ८,८४,००० ८,७१,००० १.५ ८,९०,०००
तेलंगणा ३,६२,००० ४,४७,००० (-)१९.० ५,०९,०००
उत्तर प्रदेश ७,३८,००० ७,३६,००० ०.३ ६,६७,०००
इतर १,०८,००० १,११,००० (-)२.७ १,४८,०००
एकूण ७५,०९,००० ७३,७३,००० १.८ ७४,६८,०००*
(एकूण आकड्यामध्ये काही राज्यांच्या लागवड क्षेत्राचा समावेश केलेला नाही.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com