Agriculture news in Marathi, Maize cultivation was delayed due to fear of military alley | Agrowon

लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडी लांबल्या

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

जळगाव ः खानदेशात हरभऱ्यानंतर महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मका पिकाच्या लागवडीसंबंधी अजूनही फारशा हालचाली दिसत नसल्याचे चित्र आहे. खरिपात मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घातला होता. आता रब्बीतही मका पिकाला ही अळी फस्त करील, या भीतीने शेतकरी मका लागवडीसंबंधी धजावत नसल्याचे चित्र आहे. 

जळगाव ः खानदेशात हरभऱ्यानंतर महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मका पिकाच्या लागवडीसंबंधी अजूनही फारशा हालचाली दिसत नसल्याचे चित्र आहे. खरिपात मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घातला होता. आता रब्बीतही मका पिकाला ही अळी फस्त करील, या भीतीने शेतकरी मका लागवडीसंबंधी धजावत नसल्याचे चित्र आहे. 

रब्बी हंगामाचे नियोजन करताना मका पिकासंबंधी कृषी विभागाने बियाणे, लागवडीनंतरची जनजागृती यासंबंधी आराखडा बांधला आहे. मका पीक महत्त्वाचे आहे. त्यातून धान्य व चारा उपलब्ध होतो. मक्‍याचे दर मागील दोन वर्षे टिकून असून, किमान १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर जागेवरच शेतकऱ्यांना मिळाला आहे. यंदा मक्‍याचे खरिपात लष्करी अळी व नंतर अतिवृष्टीत नुकसान झाल्याने बाजारात मक्‍याची अपवादानेदेखील आवक सुरू नाही. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वादोन ते अडीच लाख हेक्‍टरवर रब्बी हंगाम असणार आहे. यात किमान ६० ते ७० हजार हेक्‍टरवर मक्‍याची लागवड अपेक्षित मानली जाते. परंतु, लष्करी अळीचे संकट कायम आहे. मराठवाड्यात काही शेतकऱ्यांना महिनाभरापूर्वी पेरलेल ज्वारी पिकात लष्करी अळी आल्याने पीक मोडावे लागल्याची माहिती शेतकऱ्यांमध्ये समाजमाध्यमातून फिरत आहे. यामुळे आपल्याकडेदेखील मका, ज्वारीवर लष्करी अळी येईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. 

परिणामी, मक्‍याची लागवड सुरू झालेली दिसत नाही. अनेक शेतकरी नोव्हेंबरच्या मध्यात मका लागवड करतात. तर काही शेतकरी कापसाखालील क्षेत्र रिकामे करून डिसेंबरअखेरिस मका लागवड करतात. नोव्हेंबरमध्ये कडधान्य, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात मका लागवडीचा प्रघात आहे. यंदा पाऊसमान चांगले राहिल्याने गिरणा, तापी, वाघूर नदीच्या क्षेत्रात जळगाव जिल्ह्यात मका लागवड बऱ्यापैकी होईल, अशी अपेक्षा आहे.

शेतकरी संभ्रमात
धुळ्यात शिरपुरात तर नंदुरबारमध्ये शहादा, नवापूर भागात मका लागवड होत असते. अनेक शेतकरी उत्तम व्यवस्थापन करून एकरी २५ ते ३० क्विंटल मका उत्पादन साध्य करतात. परंतु, लष्करी अळीसंबंधी उपाययोजना होत नाहीत. कुठली कीडनाशके, प्रतिबंधात्मक उपाय करावेत, याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. शिवाय खर्च वाढत आहे. यामुळे शेतकरी तूर्ततरी मका लागवड टाळत असल्याचे सांगितले जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...