Agriculture news in Marathi, Maize destroyed heavy rain in Angangaon area | Page 2 ||| Agrowon

अंगणगाव परिसरात मका भुईसपाट

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

चिचोंडी, जि. नाशिक ः अंगणगाव (ता. येवला) येथे शनिवारी (ता. ५) दुपारी साडेतीनला अचानक आलेल्या वादळी पावसाने मका पिकाचे नुकसान झाले. ३६ चारी नजीक आप्पा गायकवाड, भास्कर गायकवाड, नंदू गायकवाड, विलास गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, संतोष गायकवाड, वसंत गायकवाड यांच्या शेतातील मका वादळी पावसाने भुईसपाट झाला.

चिचोंडी, जि. नाशिक ः अंगणगाव (ता. येवला) येथे शनिवारी (ता. ५) दुपारी साडेतीनला अचानक आलेल्या वादळी पावसाने मका पिकाचे नुकसान झाले. ३६ चारी नजीक आप्पा गायकवाड, भास्कर गायकवाड, नंदू गायकवाड, विलास गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, संतोष गायकवाड, वसंत गायकवाड यांच्या शेतातील मका वादळी पावसाने भुईसपाट झाला.

यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून, शेतातील पिके सध्या काढणीच्या अवस्थेत आहेत. परतीच्या पावसाने अंगणगाव परिसरात दुपारी जोरदार हजेरी लावली. सुरवातीला जोराचा वारा असल्याने शेतातील मका भुईसपाट झाला. ३६ चारीनजीक असलेले भास्कर गायकवाड यांचे दोन एकर, नंदू गायकवाड यांचे दोन एकर, आप्पा गायकवाड यांचे दोन एकर याशिवाय वसंत गायकवाड, संतोष गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, विलास गायकवाड, तसेच परिसरातील अनेक शेतांतील मका वादळी पावसाने आडवा झाला. आधीच लष्करी अळीने संकटात असलेला मका कसाबसा वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले; मात्र परतीचा पाऊस अनेक भागात वादळी वाऱ्यासह पडत आहे. यामुळे काढणीयोग्य झालेले पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे आता संकटात सापडले आहे. येथील नीलेश गायकवाड, गणेश गायकवाड, महेश गायकवाड यांनी कांदा पिकातील पाणी काढून देत शेतातील पाणी कमी केले.

कसबे सुकेणे, दिक्षी परिसरात
तब्बल तीस तास पाऊस

सायंकाळी पाचला सुरू झालेल्या वादळी पावसाने जवळपास तीन तासभर सुकेणे व दिक्षी परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची छाटणी झालेली आहे. मोगरलेल्या व फेल काढलेल्या द्राक्षबागांचे या पावसाने मोठे नुकसान होणार आहे. रात्रभर बागांवर पाणी असल्याने फवारणी करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

येवल्यात तासाभरात 
५० मिलिमीटर पाऊस

येवला : शहर व तालुक्‍यात शनिवारी (ता. ५) दुपारी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसाने मका, बाजरी व कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. शहरात तासाभरात सुमारे ५० मिलिमीटर पाऊस पडला. इतके दिवस प्रतीक्षा करायला लावणारा पाऊस मात्र आता धो धो कोसळताना दिसतोय. 
 


इतर बातम्या
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
अकोला जिल्हा परिषदेला जमीन...अकोला ः जिल्ह्यात दोन ठिकाणी परिषदेच्या मालकीची...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
सांगलीत दोन हजार क्विंटल कापूस...सलगरे, जि. सांगली ः कापसाला शेजारच्या कर्नाटक...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
सात तालुक्‍यांतील अनुदान थकलेल्या...नगर ः पशुधन जगविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
मुंबई बाजार समितीतील २३ अधिकारी,...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...