मका, चारा, कडवळ पिकावर हिरव्या नाकतोड्याचा प्रादुर्भाव

औरंगाबाद : तालुक्यातील आडगाव, निपाणी, कोनेवाडी या परिसरात काही मका, चारा, कडवळ पिकावर हिरव्या नाकतोड्याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे यांनी दिली.
On maize, fodder, weed crop Outbreaks appear to be exacerbated during pregnancy
On maize, fodder, weed crop Outbreaks appear to be exacerbated during pregnancy

औरंगाबाद  : तालुक्यातील आडगाव, निपाणी, कोनेवाडी या परिसरात काही मका, चारा, कडवळ पिकावर हिरव्या नाकतोड्याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद तालुक्यातील आडगाव या गावातील शेतकऱ्यांनी रविवारी (ता. १२) संबंधित कृषी सहाय्यकास माहिती दिली.  रविवारी सायंकाळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे यांनी आडगाव येथे शेतावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी ते हिरवे नाकतोडे आहेत. त्यांची मादी बांधावरील गवतावर अंडी घालते. त्यानंतर लहान पिल्ले होऊन चाऱ्याच्या मका व कडवळावर उपजीविका करीत असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले.

त्यांचे नियंत्रण करण्यासाठी क्लोरपायरीफॅास (५० इसी) १० मिली किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ इसी) १० मिली प्रति १० लिटर पाण्यात घेऊन (हाय व्हॉल्यूम फवारणी यंत्र) फवारणी करावी. त्यानंतर १ ते सव्वा महिना ती मका, कडवळ जनावरास खाण्यास देऊ नये असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. 

दरम्यान, मंगळवारी (ता. १४) आडगाव येथे तज्ञ व अधिकाऱ्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांनी सुचविलेल्या उपायांमुळे त्या हिरव्या नाकतोड्याचे नियंत्रण झाल्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अनिल हदगावकर व इतर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com