agriculture news in Marathi maize payment pending from 40 days Maharashtra | Agrowon

मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

 जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका उत्पादकांचे सुमारे ३१ कोटी रुपये शासनाकडे अडकले आहेत.

जळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका उत्पादकांचे सुमारे ३१ कोटी रुपये शासनाकडे अडकले आहेत. शेतकरी आर्थिक संकटात असतानाच शासनाकडून मका खरेदीसंबंधीचे चुकारे अदा केले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

सुरुवातीला ११ कोटी रुपये जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसंबंधीचे चुकारे अदा करण्यासाठी प्राप्त झाले. या निधीचे वितरण झाले. जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांकडून मक्याची खरेदी झाली आहे. सुमारे दोन लाख क्विंटल मका खरेदी झाली आहे. तर सुमारे ७५ हजार क्विंटल ज्वारीची खरेदी केली आहे. यातील सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी मका, ज्वारीची विक्री शासकीय केंद्रात केली, त्यांचेच चुकारे प्राप्त झाले. उर्वरित शेतकऱ्यांचे चुकारे प्राप्त झालेले नाहीत.

खरेदीनंतरची बिले व इतर माहिती खरेदी केंद्रातून शासनाच्या पोर्टलवर भरण्यात आली आहे. स्थानिक मार्केटींग फेडरेशनच्या कार्यालयानेदेखील माहिती शासनाला किंवा मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयास सादर केली आहे. परंतु चुकारे अदा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

मका विक्री करून ४० ते ४५ दिवस झाले तरीदेखील चुकारे प्राप्त होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत दोन-तीनदा संबंधित खरेदी केंद्राशी अनेक शेतकऱ्यांनी संपर्क साधला. आपली अडचण सांगितली. तसेच बँकेतही संपर्क साधला. परंतु समाधानकारक उत्तर मिळत नाही. शासकीय केंद्रात मक्याची विक्री केली आणि अडचण उभी करून घेतली, असा मनस्ताप काही शेतकरी करीत आहेत.

यात मार्केटींग फेडरेशननुसार पुढील आठवड्यात सुमारे ५० हजार क्विंटल मका खरेदीसंबंधीचे चुकारे अदा केले जातील. निधी प्राप्त झाला आहे. त्याचे वितरण लवकरच सुरू होईल.


इतर अॅग्रो विशेष
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...