agriculture news in marathi Maize prices improved in Khandesh | Agrowon

खानदेशात मका दर सुधारले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दर्जेदार मक्याला प्रतिक्विंटल कमाल १ हजार ४०० रुपये दर मिळाला आहे.

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दर्जेदार मक्याला प्रतिक्विंटल कमाल १ हजार ४०० रुपये दर मिळाला आहे. दरात गेल्या १५ दिवसांत क्विंटलमागे १०० ते १२५ रुपयांची सुधारणा झाली आहे.

मध्यंतरी किमान दर १००० व कमाल दर १ हजार २७५ रुपये प्रतिक्विंटल, असे होते. दरात सुधारणा दिसत नव्हती. शासकीय खरेदी देखील बंद आहे. यामुळे बाजारात मक्याची विक्री शेतकरी करीत होते. अशातच मक्याची आवक गेल्या महिन्यात निम्म्यापेक्षा अधिक घटली. यानंतर दरात सुधारणा सुरू झाली आहे.

गेल्या पंधरवड्यात मक्याला प्रतिक्विंटल १ हजार २७५ रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. तर या आठवड्यात कमाल दर १ हजार ४०० रुपयांपर्यंत पोचला आहे. दरात सुधारणा झालेली असली तरी सध्या आवक कमी आहे. खरिपातील मक्याची विक्री बहुसंख्य शेतकऱ्यांनी केली आहे. रब्बी हंगामातील मक्याची विक्री सुरू झालेली नाही. कारण काढणी एप्रिलमध्ये सुरू होईल. आगाप लागवडीच्या मक्याची काढणी पुढील आठवड्यात सुरू होईल. 

मक्याची आवक जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, जळगाव या बाजार समित्यांमध्ये अत्यल्प अशीच आहे. धुळे जिल्ह्यात मक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील बाजारातही आवक कमी आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, अमळनेर, जळगाव या बाजारात गेल्या चार दिवसांत प्रतिदिन मिळून सरासरी एक हजार क्विंटल मक्याची आवक झाली आहे.

नोव्हेंबरमध्ये या बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन सरासरी मिळून आठ हजार क्विंटल एवढी आवक सुरू होती. शेतकऱ्यांकडील आवक कमी असल्याने या दरातील सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांना फारसा होताना दिसत नसल्याची स्थिती आहे. व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार सुरू आहेत. जिल्ह्याबाहेर व मध्य प्रदेशातही मक्याची साठवणूक खानदेशातील व्यापारी करीत आहेत. शेतकऱ्यांकडील आवक सुरू होईल तोपर्यंत मका दर टिकून राहावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...