agriculture news in marathi Maize procurement started in Baramati | Agrowon

बारामतीत हमीभावाने मका खरेदी सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका खरेदी केंद्र माळेगाव-बु येथील शासकीय गोदाम येथे सुरू करण्यात आले.

पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका खरेदी केंद्र माळेगाव-बु येथील शासकीय गोदाम येथे सुरू करण्यात आले. हे केंद्र गुरुवार (ता.१९) पासून सुरू करण्यात आले. मक्याची प्रतिक्विंटल १८५० रुपये हमीभावाने खरेदी केली जात आहे.  

बाजार समितीच्या वतीने शेतकरी प्रतिनिधी बाळासाहेब पोमणे, रमेशराव गोफणे, श्री स्वामी, नीरा कॅनॉल संघाचे अमोल कदम, श्री मदने आदी उपस्थित होते. मार्केटिंग फेडरेशनमार्फत नीरा कॅनॉल संघाची खरेदी एजन्सी म्हणून नेमणूक केली आहे. तीन हत्ती चौकातील संघात नावनोंदणी सुरू आहे. सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन बारामती बाजार समितीमार्फत करण्यात आले.  

बाजार आवारात मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी निघत असल्याने बारामती बाजार समितीने मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सरकारकडे मागणी केली होती. त्यानुसार हे केंद्र सुरू केले आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी एसएमएस आल्यानंतर मका स्वच्छ व वाळवून आणावी. शासनाच्या नियमानुसार प्रतिएकर दहा क्विंटल मका खरेदी करण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी सात-बारा उताऱ्यावर मका या पिकांची नोंद 
करावी.

खरेदीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असून ऑनलाइन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचीच मका खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...