मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
बातम्या
बारामतीत हमीभावाने मका खरेदी सुरू
पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका खरेदी केंद्र माळेगाव-बु येथील शासकीय गोदाम येथे सुरू करण्यात आले.
पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका खरेदी केंद्र माळेगाव-बु येथील शासकीय गोदाम येथे सुरू करण्यात आले. हे केंद्र गुरुवार (ता.१९) पासून सुरू करण्यात आले. मक्याची प्रतिक्विंटल १८५० रुपये हमीभावाने खरेदी केली जात आहे.
बाजार समितीच्या वतीने शेतकरी प्रतिनिधी बाळासाहेब पोमणे, रमेशराव गोफणे, श्री स्वामी, नीरा कॅनॉल संघाचे अमोल कदम, श्री मदने आदी उपस्थित होते. मार्केटिंग फेडरेशनमार्फत नीरा कॅनॉल संघाची खरेदी एजन्सी म्हणून नेमणूक केली आहे. तीन हत्ती चौकातील संघात नावनोंदणी सुरू आहे. सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन बारामती बाजार समितीमार्फत करण्यात आले.
बाजार आवारात मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी निघत असल्याने बारामती बाजार समितीने मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सरकारकडे मागणी केली होती. त्यानुसार हे केंद्र सुरू केले आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी एसएमएस आल्यानंतर मका स्वच्छ व वाळवून आणावी. शासनाच्या नियमानुसार प्रतिएकर दहा क्विंटल मका खरेदी करण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी सात-बारा उताऱ्यावर मका या पिकांची नोंद
करावी.
खरेदीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असून ऑनलाइन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचीच मका खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
- 1 of 1504
- ››