agriculture news in Marathi maize procurement stopped due to godwon scarcity Maharashtra | Agrowon

गोदामाअभावी मका खरेदी बंद 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 जुलै 2020

गोंड पिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे सुरू करण्यात आलेले मका खरेदी केंद्र महिनाभरातच बंद करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

चंद्रपूर ः गोंड पिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे सुरू करण्यात आलेले मका खरेदी केंद्र महिनाभरातच बंद करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. येथील खरेदी पूर्ववत व्हावी याकरिता गोदामातील मालाची उचल करावी, अशी मागणी बाजार समिती संचालक विनोद नागापुरे यांनी केली आहे. 

गोंड पिंपरी परिसरात लागवड क्षेत्र वाढीस लागल्याने उत्पादित मक्याची हमीभावाने खरेदीची मागणी होऊ लागली. त्याची दखल घेत प्रशासनाकडून भंगाराम तळोधी येथे हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले. या परिसरातील २० ते २५ गावातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. परंतु केंद्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधीदेखील झाला नसताना हे केंद्र बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढविली आहे. मका साठवणुकीसाठी असलेले गोदाम भरल्याने हा निर्णय घ्यावा लागला. 

विशेष म्हणजे गोदामाची व्यवस्था करण्यात यावी किंवा असलेल्या गोदामातील मालाची उचल करावी, अशी मागणी दहा दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणत्याच प्रकारच्या हालचाली न झाल्याने खरेदी केंद्र अखेरीस बंद झाले. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. परिसरातील अनेक शेतकरी मका विकायच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु जोपर्यंत गोदामातील मालाची उचल होत नाही तोवर नव्याने मका खरेदी न करण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतला आहे. 

दरम्यान, मका खरेदीला शासनाने शुक्रवार (ता. १७) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु या मुदतवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याची दखल घेत तत्काळ गोदामातील मालाची उचल करावी, अशी मागणी विनोद नागपुरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...