agriculture news in marathi Maize Procurement Stopped in Maharashtra, Farmers demards to start again | Agrowon

मका खरेदी ठप्प झाल्याने दर पाडले

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 डिसेंबर 2020

केंद्र सरकारडून राज्यात मका खरेदीसाठी ४ लाख ४९ हजार ५४० क्विंटलचे उद्दिष्ट होते. तीन दिवसांपूर्वीच हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून ऑनलाइन पोर्टल आणि मका खरेदी बंद करण्यात आली आहे. नों

नाशिक : केंद्र सरकारडून राज्यात मका खरेदीसाठी ४ लाख ४९ हजार ५४० क्विंटलचे उद्दिष्ट होते. तीन दिवसांपूर्वीच हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून ऑनलाइन पोर्टल आणि मका खरेदी बंद करण्यात आली आहे. नोंदणी करूनही हजारो शेतकरी विक्रीशिवाय वंचित राहिले असून, सुमारे ६० टक्के मका अद्यापही शेतकऱ्यांकडे आहे. अशातच बाजारातील कमी दर आणि व्यापारी भाव पाडून मागू लागल्याने मका खरेदी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

खरीप हंगाम २०२०-२१मधील भरडधान्य खरेदीसाठी खरेदीपूर्व ऑनलाइन नोंदणी २० डिसेंबरपर्यंत करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाल्या होत्या. राज्यभरात फेडरेशनकडून बुधवार (ता. १६) अखेर ४८ हजार ४२०, तर महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडे ७८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी अनुक्रमे २२४६६ व ६६३ शेतकऱ्यांकडून ४ लाख ४९ हजार ५४० क्विंटल मका हमीभावाने (१८५० रुपये प्रति क्विंटलने) खरेदी झाली आहे. केंद्र सरकारने दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे मका खरेदी अचानक बंद करण्यात आली. मात्र ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी अद्यापही निम्म्यावर विक्रीवाचून वंचित असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना आहे. 

अशातच शासकीय खरेदी सुरू असताना बाजारात १४०० ते १२०० दरम्यान असलेला मका खरेदी बंद झाल्यानंतर खूप खाली आला आहे. व्यापारी भाव पाडून मागू लागल्याने शेतकरी अवस्थ झाले 
आहेत. 

महाराष्ट्र राज्य फेडरेशनकडून
राज्यात जिल्हानिहाय झालेली खरेदी
(बुधवार, ता.१६ अखेर)

जिल्हा खरेदी (क्विंटल) किंमत शेतकरी खरेदी संख्या
नागपूर २,४६६ ४५,६२,१०० १६७
नगर २०,८५८ ३,८५,८७,३०० ६३१
अकोला २,६४२ ४८,८७,७०० ६४
अमरावती २,२५८ ४१,७६,३७५ ७७
औरंगाबाद २१,९४४ ४,०५,९५,४७५ ५३२
बीड १,७५२ ३२,४०,९२३ १६७
बुलडाणा १,४०,९२४ २६,०७,१०,१४० ३६८५
धुळे ३५,७४४ ६,६१,२५,४७५ १००९
जळगाव ५२,६८१ ९,७४,५८,९२५ ११९०
जालना २७,६८४ ५,१२,१४,४७५ ६६१
नाशिक ७३,२१५ १३,५४,४६,८२५ १५२८
पुणे ३३५५ ६२,०६,७५० १६४
सांगली ५२७ ९,७४,०२५ ३६
सातारा ६९३ १२,८१,१२५ ५३
सोलापूर २५,३६५ ४,६९,२५,२५० ९९९
एकूण ४,१२,१०४ ७६,२३,९२,८६३ १०,९६३

दरम्यान, ऑफलाइन खरेदीची प्रतिपूर्ती केंद्र शासनाकडून होत नसल्याने अशा खरेदीची जबाबदारी राज्य शासनाची राहणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऑफलाइन खरेदी झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे खरेदी करण्याऱ्या संस्थेची असल्याचे मार्केटिंग फेडरेशनने कळविले आहे. त्यामुळे अनेक खरेदी केंद्रावरून मका विक्रीसाठी संदेश पाठविण्यात आले, मात्र बुधवारी (ता.१६) सायंकाळी त्याच दिवशी विक्रीसाठी आणू नका, असा संदेश आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

बाजरी खरेदीही थांबली...
राज्यभरात बाजरी खरेदीचा लक्ष्यांक ९ हजार ५०० क्विंटल देण्यात आला होता. त्याचेही पोर्टल गेल्या तीन दिवसांपूर्वी बंद करण्यात आले आहे. या अनुषंगाने मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयामार्फत खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळण्याबाबत प्रधान कार्यालयास कळविण्यात आलेले आहे.

राज्यातील पीकनिहाय देण्यात आलेले उद्दिष्ट
धान्य :    उद्दिष्ट (क्विंटल)
मका  :  ४ लाख ४९ हजार ५४०
ज्वारी  :  १५ लाख ४३ हजार ६७०
बाजरी :   ९ हजार ५००५

प्रतिक्रिया..
मका खरेदी अचानक बंद झाल्याने व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत.  शेतकऱ्यांची कोंडी झाली असून, शासकीय खरेदी केंद्र पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना किमान हमीभावाचा दर मिळावा, अशी आमची मागणी आहे.  
- गजेंद्र देशमुख, शेतकरी, माहेगाव देशमुख, ता. कोपरगाव, जि. नगर

केंद्र सरकारकडून आधारभूत दराने राज्याला दिलेला मका खरेदीचा लक्ष्यांक पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना दरात फटका बसणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेत आहे. यासाठी संबंधित अन्न नागरी पुरवठा विभागासह मी स्वतः कृषी विभागाकडून उद्दिष्टवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- दादा भुसे, कृषिमंत्री

 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...