भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
अॅग्रो विशेष
राज्यात साडेचार लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या नुकत्याच प्राप्त आदेशावरून सुरू झालेली ही भरडधान्य खरेदी येत्या ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका महिन्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या नुकत्याच प्राप्त आदेशावरून सुरू झालेली ही भरडधान्य खरेदी येत्या ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. राज्याला मका खरेदीचे ४ लाख ५४ हजार ३६८ क्विंटल १५ किलोचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
उद्दिष्टपूर्ती झाल्याने राज्यातील मका खरेदी जवळपास महिनाभरापूर्वी बंद पडली होती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना खरेदी करणे बाकी असताना व खरेदी केलेल्या भरडधान्याची लॉट एन्ट्री बाकी असल्याने मका खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. या मागणीवर झालेल्या निर्णयामुळे अनुक्रमे १४ व १५ जानेवारीला राज्यातील भरडधान्य खरेदीला मुदतवाढ देण्यात आली.
त्यानुसार निश्चित केलेल्या जिल्हानिहाय उद्दिष्टानुसार केंद्रनिहाय उद्दिष्ट निश्चित करून खरेदीला सुरुवात करण्याचे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडकडून राज्यातील औरंगाबाद, जालना, बीड नाशिक, धुळे-नंदूरबार, जळगाव, नगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व यवतमाळ आदी जिल्ह्यांच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यानुसार औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत मका खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे.
आधी व आता नव्या सुरू झालेल्या मका खरेदीत जालना जिल्ह्यात आतापर्यंत सात केंद्रांवरून ९२६ शेतकऱ्यांकडील ३९ हजार ४२ क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी २७ हजार ६८३ क्विंटल मका संबंधित तहसील कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातही ११ केंद्रांवर नोंदणी झालेल्या ४५५७ शेतकऱ्यांपैकी ६८४ शेतकऱ्यांकडील २७ हजार ५२० क्विंटल मका खरेदी करण्यात आली. त्यापैकी २१ हजार ३३२ क्विंटल मकाच्या हुंड्या प्रधान कार्यालयास पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयाकडून देण्यात आली.
...अशा आहेत अटी
- आधीची खरेदी बंद झाल्यानंतर ज्या लॉट एन्ट्री प्रलंबित आहेत, त्या प्रथम पूर्ण कराव्यात.
- प्रलंबित लॉट एंट्री हिशेबात घेऊन केंद्रनिहाय उद्दिष्ट निश्चित करावे.
- कोणत्याही परिस्थितीत नवीन शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करू नये.
- लॉट एंट्रीसाठी ३१ जानेवारीनंतर एनईएमएल पोर्टल सुरू करण्यात येणार नाही.
- केंद्रनिहाय निश्चित उद्दिष्टानुसार शेतकऱ्यांना एसएमएस देण्यात यावे.
जिल्हानिहाय मका खरेदीचे उद्दिष्ट (क्विंटलमध्ये)
नगर : ५००००
अकोला : ५०६६.३५
अमरावती : ३०९२७.४८
औरंगाबाद : ६५५०८.२०
बीड : १७५१६.१०
बुलडाणा : ४७५००
धुळे : ३८०००
गडचिरोली : २७
जळगाव : २८१०४
जालना : ३४७५२.९०
नागपूर : ११९९१.८५
नंदूरबार : १०४५५.२२
नाशिक : ५६०००
पुणे : ४०२२.३०
सांगली : ५३२०.९५
सातारा : ८३२५.८०
सोलापूर : ३८०००
नांदेड : २८५०
ज्वारी, बाजरी खरेदीचे उद्दिष्ट
भरडधान्य खरेदीत दहा जिल्ह्यात ६० हजार ३४९ क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ज्वारी खरेदीच्या उद्दिष्टांमध्ये अकोला, अमरावती, बीड, बुलडाणा, धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, नांदेड, यवतमाळ आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. बीड, धुळे, जळगाव, नंदूरबार व नाशिक या पाच जिल्ह्यांत ५१२९० क्विंटल बाजरीची खरेदी करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.
- 1 of 672
- ››