agriculture news in Marathi maize procurement target on 4.5 lac quintal Maharashtra | Agrowon

राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट 

संतोष मुंढे
गुरुवार, 21 जानेवारी 2021

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या नुकत्याच प्राप्त आदेशावरून सुरू झालेली ही भरडधान्य खरेदी येत्या ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका महिन्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या नुकत्याच प्राप्त आदेशावरून सुरू झालेली ही भरडधान्य खरेदी येत्या ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. राज्याला मका खरेदीचे ४ लाख ५४ हजार ३६८ क्‍विंटल १५ किलोचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

उद्दिष्टपूर्ती झाल्याने राज्यातील मका खरेदी जवळपास महिनाभरापूर्वी बंद पडली होती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना खरेदी करणे बाकी असताना व खरेदी केलेल्या भरडधान्याची लॉट एन्ट्री बाकी असल्याने मका खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. या मागणीवर झालेल्या निर्णयामुळे अनुक्रमे १४ व १५ जानेवारीला राज्यातील भरडधान्य खरेदीला मुदतवाढ देण्यात आली.

त्यानुसार निश्‍चित केलेल्या जिल्हानिहाय उद्दिष्टानुसार केंद्रनिहाय उद्दिष्ट निश्‍चित करून खरेदीला सुरुवात करण्याचे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडकडून राज्यातील औरंगाबाद, जालना, बीड नाशिक, धुळे-नंदूरबार, जळगाव, नगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व यवतमाळ आदी जिल्ह्यांच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यानुसार औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत मका खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. 

आधी व आता नव्या सुरू झालेल्या मका खरेदीत जालना जिल्ह्यात आतापर्यंत सात केंद्रांवरून ९२६ शेतकऱ्यांकडील ३९ हजार ४२ क्‍विंटल मका खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी २७ हजार ६८३ क्‍विंटल मका संबंधित तहसील कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातही ११ केंद्रांवर नोंदणी झालेल्या ४५५७ शेतकऱ्यांपैकी ६८४ शेतकऱ्यांकडील २७ हजार ५२० क्‍विंटल मका खरेदी करण्यात आली. त्यापैकी २१ हजार ३३२ क्‍विंटल मकाच्या हुंड्या प्रधान कार्यालयास पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयाकडून देण्यात आली. 

...अशा आहेत अटी 

  • आधीची खरेदी बंद झाल्यानंतर ज्या लॉट एन्ट्री प्रलंबित आहेत, त्या प्रथम पूर्ण कराव्यात. 
  • प्रलंबित लॉट एंट्री हिशेबात घेऊन केंद्रनिहाय उद्दिष्ट निश्‍चित करावे. 
  • कोणत्याही परिस्थितीत नवीन शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करू नये. 
  • लॉट एंट्रीसाठी ३१ जानेवारीनंतर एनईएमएल पोर्टल सुरू करण्यात येणार नाही. 
  • केंद्रनिहाय निश्‍चित उद्दिष्टानुसार शेतकऱ्यांना एसएमएस देण्यात यावे. 

जिल्हानिहाय मका खरेदीचे उद्दिष्ट (क्‍विंटलमध्ये) 
नगर :
५०००० 
अकोला : ५०६६.३५ 
अमरावती : ३०९२७.४८ 
औरंगाबाद : ६५५०८.२० 
बीड : १७५१६.१० 
बुलडाणा : ४७५०० 
धुळे : ३८००० 
गडचिरोली : २७ 
जळगाव : २८१०४ 
जालना : ३४७५२.९० 
नागपूर : ११९९१.८५ 
नंदूरबार : १०४५५.२२ 
नाशिक : ५६००० 
पुणे : ४०२२.३० 
सांगली : ५३२०.९५ 
सातारा : ८३२५.८० 
सोलापूर : ३८००० 
नांदेड : २८५० 

ज्वारी, बाजरी खरेदीचे उद्दिष्ट 
भरडधान्य खरेदीत दहा जिल्ह्यात ६० हजार ३४९ क्‍विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ज्वारी खरेदीच्या उद्दिष्टांमध्ये अकोला, अमरावती, बीड, बुलडाणा, धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, नांदेड, यवतमाळ आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. बीड, धुळे, जळगाव, नंदूरबार व नाशिक या पाच जिल्ह्यांत ५१२९० क्‍विंटल बाजरीची खरेदी करण्याचेही निश्‍चित करण्यात आले आहे. 


इतर बातम्या
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
शासकीय हरभरा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना...जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘...रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार...
कापडण्यात कांद्याला फटकाकापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस...
परभणी जिल्ह्यात अवकाळीने हरभरा, ज्वारी...परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस...
मारुती माळ येथे टस्कराचे दर्शनकोल्हापूर ः बाळेघोल (ता. कागल) येथील जंगलातून...
मराठवाड्यात अवकाळीने ३३ टक्के पिकांचे...औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी...नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या...
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण...अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला...
...तर खंडणीचे गुन्हे दाखल करा ः गरडपुणे ः ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा...कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून...
बाजार समित्यांनी पेट्रोल, सीएनजी पंप...परभणी ः उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा...
जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची ‘गिनेस...जळगाव :  जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष...
सातारा जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर...सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...