agriculture news in Marathi maize producers agitation in Satana Maharashtra | Agrowon

मक्याची लॉट एंट्री न झाल्याने ‘शोले स्टाइल’ आंदोलन 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

मीभावाने खरेदी केलेल्या मक्याची लॉट एंट्री न झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील १३४ शेतकऱ्यांचा ३६७७ क्विंटल मका परत करण्याचा निर्णय महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने घेतला. 

सटाणा, जि. नाशिक: हमीभावाने खरेदी केलेल्या मक्याची लॉट एंट्री न झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील १३४ शेतकऱ्यांचा ३६७७ क्विंटल मका परत करण्याचा निर्णय महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने घेतला. त्यामुळे हा निर्णय त्वरित मागे घेऊन खरेदी केलेल्या मक्याची रक्कम अदा करावी, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षातर्फे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.२१) बागलाण तहसील कार्यालय आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन छेडले. 

तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी मध्यस्थी करत मार्केटिंग फेडरेशनशी चर्चा आणि पत्रव्यवहार करून याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र न्याय मिळाला नाही तर ५ नोव्हेंबरपासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला. 

दिलेल्या निवेदनात म्हटले, की शासनाच्या भरडधान्य खरेदी योजनेनुसार रब्बी हंगामात हमीभावाने मका खरेदी केली होती. मात्र महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यातील मार्केटिंग अधिकाऱ्यांना पत्र देऊन शासनाने हमीभावाने मका खरेदी करताना लॉट एंट्री पोर्टल अचानक बंद केले आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात मका खरेदी करताना जिल्ह्यातील १३४ शेतकऱ्यांच्या ३६७७ क्विंटल खरेदी मक्याची शासनाच्या पोर्टलवर नोंद झाली नाही. हा व्यवहार ऑफलइन पद्धतीने झाला आहे.

आधारभूत किमतीने मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने आता मार्केटिंग फेडरेशनतर्फे लॉट एंट्री न झालेला हा अतिरिक्त मका संबंधित शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनने मका खरेदी करणाऱ्या जिल्ह्यातील संस्थांना दिले आहेत. हा आदेश तत्काळ रद्द करून सर्व शेतकऱ्यांना त्यांची शासनाकडे येणे असलेली रक्कम त्वरित अदा करावी. 

आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष अहिरे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश काकुळते, अरुण अहिरे, अमोल शिरोडे, जनार्दन शिरोडे, अशोक चव्हाण, विलास चव्हाण शंकर नेरकर, दिलीप सोनवणे, पराग सूर्यवंशी, काळू काकुळते, पांडुरंग काकुळते, महारु बिरारी, शांताराम काकुळते, पंकज बिरारी, तरुण गुंजाळ आदींसह शेतकरी सहभागी होते. 
 


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...