agriculture news in Marathi maize producers waiting for government decision Maharashtra | Agrowon

मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

 हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद होऊनही शेकडो वाहनांत मका घेऊन शेतकरी केंद्रांवर मुक्काम ठोकून आहेत. 

औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद होऊनही शेकडो वाहनांत मका घेऊन शेतकरी केंद्रांवर मुक्काम ठोकून आहेत. मात्र, मका खरेदी पुन्हा सुरु करण्याची मदार पूर्णतः राज्य शासनाचा रेटा व केंद्राच्या निर्णयावरच अवलंबून आहे. मात्र, ‘ॲग्रोवन’च्या वृत्तानंतर जिल्हा प्रशासनाने कोणत्या केंद्रावर किती वाहनांची नोंदणी झाली व किती वाहने आज घडीला मका घेऊन उभी आहेत याची माहिती मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.

मका खरेदी केंद्रावर वाहने घेऊन आलेल्या काहींना नोंद घेतली निर्णय झाल्यावर बोलावू, असे सांगून परत पाठविले. परंतु अजूनही आपली मका शासन खरेदी करेल, या आशेने औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील केंद्रांवर शेकडो वाहने उभी आहेत. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील जालना, जाफराबाद, भोकरदन, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद वैजापूर आधी केंद्रांवर जवळपास ६८६ शेतकऱ्यांच्या वाहनांना आपली मका खरेदी होण्याची प्रतीक्षा होती. त्यांनंतरही शेतकरी वाहनांसह अनेक केंद्रांवर ठाण मांडून आहेत. 

खरेदी सुरू असतानाच पोर्टल बंद पडल्याने अनेकांच्या खरेदी केलेल्या मक्याची ऑनलाइन नोंद करणेही बाकी राहिले. आता पुन्हा खरेदी सुरू करावयाची असल्यास राज्य शासनाला याविषयी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. खरेदी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

मुदतवाढ देताना शासनाने लक्षांक न देता मुदतीपर्यंत खरेदी सुरू ठेवली असती तर या अडचणी आल्या नसत्या, असेही मका उत्पादकांचे म्हणणे आहे. मार्केटिंग फेडरेशनने वरिष्ठ कार्यालयाकडे खरेदीची व शिल्लक व अपेक्षित खरेदीची माहिती पाठविली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

रब्बी मका खरेदी एप्रिलमध्ये सुरू होणे अपेक्षित असताना मे अखेरीस सुरू झाली. त्यातही कोरोना संकटामुळे खरेदीवर मर्यादा आल्या. राज्यासाठी खरेदीचा लक्षांक असल्याने अचानक तो पूर्ण होऊन पोर्टल बंद पडले. ते सुरू होण्याला मुदतवाढ मिळाल्यानंतर ही साधारणतः एक दिवसाचा विलंब झाला आदी प्रकारांचा मनस्ताप मका उत्पादकांना सहन करण्याची वेळ आली.

बोनस द्यावा
विदर्भातील धान उत्पादकांना बोनस दिला जातो. त्याप्रमाणे मराठवाड्यातील मका उत्पादकांना बोनस द्यावा. शेतकरी अडचणीत असतानाही बोनस देण्याच्या पर्यायाचा शासनकर्ते व लोकप्रतिनिधी का विचार करत नाहीत? असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.

प्रतिक्रिया
माझा १५० क्विंटल मका पडून आहे. मी नाव नोंदणी केली होती आणि मला मेसेज पण आला. मेसेज आल्यानंतर मी खरेदी केंद्रावर गेला असता त्यांनी सांगितले की पोर्टल बंद झाले आहे. शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की, राहिलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात यावा.    
- आबा शांताराम कोल्हे, मका उत्पादक, घोसला, जि. औरंगाबाद


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...