भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
बाजारभाव बातम्या
खानदेशात मका दरात सुधारणा
खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक रखडत सुरू आहे. परंतु दरात क्विंटलमागे १५० ते १७५ रुपयांची सुधारणा झाली असून, कमाल दर १४०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.
जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक रखडत सुरू आहे. परंतु दरात क्विंटलमागे १५० ते १७५ रुपयांची सुधारणा झाली असून, कमाल दर १४०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.
मक्यासाठी धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), शिरपूर, नंदुरबारमधील शहादा व नंदुरबार, जळगावमधील जळगाव, अमळनेर, चोपडा या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. जळगाव येथील बाजारासह चोपडा येथेही मक्याची आवक रखडत सुरू आहे. मक्याचे दर शासकीय खरेदी बंद झाल्यानंतर पडले होते. किमान दर १००० व कमाल दर १२५० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. परंतु त्यात या आठवड्यात काहीशी सुधारणा दिसत आहे. दर्जेदार मक्याला प्रतिक्विंटल १४०० ते १४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर अमळनेर, चोपडा येथील बाजारात मिळाला.
मक्याची आवक जळगाव येथील बाजारात या आठवड्यात प्रतिदिन ६०० क्विंटल एवढी होती. चोपडा येथील बाजारातही आवक प्रतिदिन ७०० क्विंटल राहिली. तर अमळनेरातील आवक प्रतिदिन १००० क्विंटल, अशी होती. दोंडाईचा येथेही प्रतिदिन ६०० क्विंटल आवक झाली. गेल्या वर्षीदेखील मक्याची आवक अतिपावसामुळे बाजारात कमी होती. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक यंदा बऱ्यापैकी आहे. तसेच दरही स्थिर आहेत. परंतु बाजारात कुठेही मक्याला हमीभाव मिळालेला नाही.
शेतकरी शासकीय खरेदीच्या प्रतीक्षेत
शासकीय खरेदी केंद्रात अनेक शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली होती. परंतु शासकीय खरेदी किरकोळ खरेदीनंतर बंद झाली. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक शेतकरी केंद्र सुरू करण्याची प्रतीक्षा करीत आहेत. यातच या आठवड्यात शासकीय खरेदी सुरू करण्याची घोषणा शासनाने केली, यामुळे मका दरात किंचित सुधारणा झाली आहे. तसेच दर स्थिर आहेत. शासकीय खरेदीच्या घोषणेने दरात सुधारणा झाल्याने बाजारात मक्याची आवक पुढे वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
- 1 of 67
- ››