agriculture news in Marathi maize rate stable in Khandesh Maharashtra | Agrowon

खानदेशात बाजारात मका दर स्थिर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 मार्च 2021

खानदेशात बाजारात मक्याची आवक वाढली आहे.  मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी असून, किमान ११०० व कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. दरात क्विंटलमागे ८० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे.

जळगाव ः खानदेशात बाजारात मक्याची आवक वाढली आहे.  मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी असून, किमान ११०० व कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. दरात क्विंटलमागे ८० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. पण बाजारात किंवा खासगी बाजारात हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासकीय खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

मक्याची लागवड खानदेशात ज्वारीपेक्षा अधिक झाली आहे. ही लागवड सुमारे ४१ हजार हेक्टरवर झाली आहे. यात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी पूर्ण झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा मका पुढील १० दिवसात मळणीवर येईल. बाजारात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी पूर्ण होऊन आवक सुरू झाली आहे. त्याचे दर ११०० ते १२३० रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत. आवक गेल्या आठवड्यात वाढली. एकरी उत्पादन २५ ते २७ क्विंटल एवढे आहे.  फारसा नफा मका उत्पादकांच्या हाती राहत नसल्याची स्थिती असली तरी दर स्थिर असल्याचा दावा बाजारातून केला जात आहे. लागवड कमी आहे. तरी दरवाढ फारशी दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

यंदा खर्च वाढला
यंदा मक्याला खर्च अधिक लागला कापणी, मळणीचा एकरी खर्च ३१०० रुपये एवढा आहे. शिवाय सुरवातीला लष्करी अळीचा अटकाव, कामगंध सापळे, खते आदी खर्च आला. त्यात शेतकऱ्याला अधिकची मेहनतदेखील करावी लागली आहे. मक्याची आवक धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, अमळनेर व जळगाव या बाजारात सुरू आहे. ही आवक गेल्या चार दिवसात चोपडा व अमळनेरात मिळून प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल एवढी झाली आहे. ही आवक आणखी वाढेल. परंतु दर स्थिर राहावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
 


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...