Agriculture news in marathi Maize, sorghum in Jalgaon district Only two shopping centers open | Agrowon

जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी दोनच केंद्रे सुरू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व ज्वारी खरेदीसाठी पारोळा व धरणगाव येथे दोनच खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. इतर १३ तालुक्‍यांमध्ये केंद्र सुरू झालेले नाहीत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातही केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. 

जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व ज्वारी खरेदीसाठी पारोळा व धरणगाव येथे दोनच खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. इतर १३ तालुक्‍यांमध्ये केंद्र सुरू झालेले नाहीत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातही केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. 

धरणगाव येथे मका खरेदीचा प्रारंभ गुरुवारी (ता.२८) झाला. या वेळी पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. मार्केटिंग फेडरेशनचे पणन अधिकारी परिमल साळुंखे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मका विक्रीसाठी जिल्ह्यात १६ केंद्रांमध्ये ३०५० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. तर, ज्वारी विक्रीसाठी ७५० शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. मका खरेदीला सुरवात झालेली असली, तरी इतर केंद्र सुरू झालेले नाहीत. 

तहसिलदारांकडून गोदामे उपलब्ध झाली नसल्याने केंद्रे सुरू झालेली नाहीत. बाजार समिती किंवा खासगी बाजारात मका, ज्वारीचे दर दबावात आहेत. मक्‍याची खरेदी १००० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे. तर, ज्वारीचे दरही २४०० रुपयांपर्यंत आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे रोज नुकसान होत आहे. यामुळे शासकीय खरेदीला वेग देण्यासह केंद्र वाढविण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः...नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...