जालना, औरंगाबादमधील मका, सोयाबीन पावसामुळे उद्ध्वस्त

सततच्या पावसाने खरिपाची पिके उद्‌धवस्त झाली आहेत. त्यांना कोंब फुटत आहेत. - ईश्‍वर पाटील, तिडका, ता. सोयगाव,जि. औरंगाबाद.
जालना, औरंगाबादमधील मका, सोयाबीन पावसामुळे उद्ध्वस्त
जालना, औरंगाबादमधील मका, सोयाबीन पावसामुळे उद्ध्वस्त

औरंगाबाद : मराठवाड्यात चार-पाच दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद व जालना जिल्हा पावसाच्या रडारवर होते. या दोन जिल्ह्यांतील सतरा पैकी आठ तालुक्‍यांत सरासरी ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. या तालुक्‍यांमधील २४ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. बुधवारी दुपारपर्यंत या दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांश भागात पावसाचा कमी अधिक प्रमाणात जोर कायम राहिला. त्यामुळे मका, सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले.  

मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ पैकी १८९ तालुक्‍यांत पावसाची नोंद झाली. लातूर, उस्मानाबादसह बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात तुरळक, हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव, सिल्लोड या तीन तालुक्‍यांत, तर जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, अंबड व घनसावंगी तालुक्‍यांत काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.  

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ६४ मंडळांत पाऊस झाला. नऊ तालुक्‍यांपैकी सरासरी ५४ ते ७० मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. फुलंब्री तालुक्‍यात सरासरी ५४ मिलिमीटर, सिल्लोड सर्वाधिक सरासरी ७०.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील आठपैकी सात तालुक्‍यांत सरासरी ३६ ते ७९ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामध्ये सर्वाधिक ७९.७५ मिलिमीटर पाऊस भोकरदन तालुक्‍यात नोंदला गेला. 

अतिवृष्‌टीची मंडळ.( मिमी. पाऊस)  औरंगाबाद जिल्हा ः आळंद ८३, वडोदबाजार ६७, सिल्लोड ८०, अजिंठा ९५, अंबाई ८७, भराडी ९५, सावलदबारा ७५, पिशोर ७१, करंजखेडा ८४, नाचनवेल ९२, चिंचोली ९४. जालना जिल्हा ः रामनगर ८४, विरेगाव ९४, पाचनवडगाव ६५, वाग्रुळ जहांगीर ११०, बावणे पांगरी ८०, सिपोरा बाजार ९५, पिंपळगाव रेणुकाई ७३, राजूर ७९, केदारखेडा ८१, अन्वा १३१, परतूर ७८, वडीगोद्री ९८

पावसाची मंडळे (५० मि.मी पुढे)

औरंगाबाद जिल्हा ः अमठाणा ५२, गोळेगाव ६१, निल्लोड ५१, सोयगाव ६३, बनोटी ६४, कन्नड ६३.  जालना जिल्हा ः बदनापूर ५८, रोशनगाव ६२, दाभाडी ५७, सेलगाव ५५, भोकरदन ६३, धावडा ५७, हस्नाबाद ६०, जाफराबाद ५६, टेंभूर्णी ६०, श्रीआष्टी ६२, अंबड ५५, धनगरपिंप्री ५२, जामखेड ५३, रोहिलागड ५४, सुखापुरी ५४, राणी उंचेगाव ५१. बीड जिल्हा ः थेरला ५६, पिंपळा ५२. 

तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या 

सततच्या पावसाने काढणीला आलेल्या खरिपाच्या सोयाबीन, मका, बाजरी या पिकाचे मोठ नुकसान झाले आहे. उत्पादित शेतीमाल काळा पडतो आहे. त्यामुळे सहाजिकच त्याच्या मिळणाऱ्या दरावरही याचा परिणाम होणार आहे. आधी पावसाअभावी, तर आता अती पावसामुळे शेतीमालाच्या होणाऱ्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा. नैसर्गिक आपत्ती तसेच काढणी पश्‍चात नुकसानीतंर्गत शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्या, अशी मागणी ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे अध्यक्ष संजय मोरे पाटील यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com