नाशिकमध्ये सोयाबीनसह मका बियाण्यांच्या १३७ तक्रारी

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन व मका बियाण्यांच्या उगवणीबाबत १३७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
 Maize with soybean in Nashik 137 Seed Complaints
Maize with soybean in Nashik 137 Seed Complaints

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन व मका बियाण्यांच्या उगवणीबाबत १३७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर कृषी विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या पथकामार्फत शेतावर जाऊन सोयाबीन व मका पिकाची पाहणी केली जात आहे. अनेक ठिकाणी पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवलेले नाही. तर, काही ठिकाणी मका पेरणीवर मररोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यातील प्राप्त तक्रारींची सर्वधिक संख्या निफाडमध्ये आहे. त्याखालोखाल चांदवड तालुक्यात आहे. त्यामध्ये उगवण क्षमता तक्रारीमध्ये महाबीज, कृषिधन, व्हीगर या कंपन्यांचा समावेश आहे. याबाबत तालुका कृषी विभागाकडे या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तालुका स्तरावरील समितीने याबाबत आढावा घेतला आहे. त्याचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे. यासह बोगस बियाण्यांच्या तक्रारींसाठी शेतकऱ्यांचा असणारा असंतोष पाहता कृषी विभाग सावध झाला आहे. त्यानुसार १० दिवसांची विशेष बियाणे तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. 

प्राप्त तक्रारींमधून काही शेतकऱ्यांनी बियाणे बदलून देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार तालुकास्तरीय समितीकडून ते परत मिळण्यासाठी बियाणे विक्रेत्या कंपन्यांसोबत पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसार आत्तापर्यंत चांदवड तालुक्यातील ६ शेतकऱ्यांना बियाणे बदलून दिले आहे, तर ४ शेतकऱ्यांनी बियाणे न उगवल्याने शेत नांगरून टाकल्याने त्यांची तपासणी करता आली नाही.  नऊ बियाणे विक्रेत्यांवर कारवाई 

जिल्ह्यात बियाणे तपासणीमध्ये बियाणे कायदा पालन न झाल्याने, तसेच उगम प्रमाणपत्रात बियाणे कंपन्या समाविष्ट नसताना इतर कंपन्यांकडून खरेदी केली. अशा ५ ठिकाणी विक्रीबंद आदेश, ४ परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक किरण वीरकर यांनी दिली.  सोयाबीनच्या तालुकानिहाय तक्रारी 

तालुका तक्रारी
निफाड ७७ 
चांदवड १८ 
मालेगाव १ 
सिन्नर २ 
त्र्यंबकेश्वर १ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com