agriculture news in Marathi, maize under threat of American fall army worm in Nashik, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या तडाख्यात
मुकुंद पिंगळे
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव अगदी सुरवातीपासूनच झाला आहे. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढले असले तरी, उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. विशेषतः येवला, मालेगाव, नांदगाव, कळवण व सटाणा या तालुक्यांमध्ये अळीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. अळीमुळे मका उत्पादनात घट होण्यासोबतच, चाराही कमी उपलब्ध होणार असल्याचे पशुपालक सांगत आहेत. 

नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव अगदी सुरवातीपासूनच झाला आहे. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढले असले तरी, उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. विशेषतः येवला, मालेगाव, नांदगाव, कळवण व सटाणा या तालुक्यांमध्ये अळीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. अळीमुळे मका उत्पादनात घट होण्यासोबतच, चाराही कमी उपलब्ध होणार असल्याचे पशुपालक सांगत आहेत. 

जिल्ह्यातील एकूण मका लागवडीचे प्रस्तावित क्षेत्र १ लाख ४३ हजार ६४५ हेक्टर असून, १३ तालुक्यांमध्ये २ लाख २३ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. म्हणजेच यंदा लागवडीत दीडपट वाढ झाली आहे. मात्र लागवड क्षेत्रापैकी ४९ हजार ९९३ हेक्टरवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची आकडेवारी कृषी विभागाकडे आहे. तर यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे मका उत्पादक शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात अगदी सुरुवातीला मक्याच्या क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव ९० टक्क्यांपेक्षा अधिक दिसून आला. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांच्या फवारण्या करून अळी पूर्णपणे नष्ट झाली नाही. सध्या २५ ते ३० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव आहे. त्यामुळे प्रतिएकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे.

लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी मक्यावर नांगर फिरवला तर काहींनी उपटून टाकला. पिकाची वाढ झाल्याने अळीने आता पानांवरून कणसांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्पादनांवर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

मक्याचे पीक दृष्टिक्षेपात 

 जिल्ह्यातील एकूण लागवड  २ लाख २३ हजार ५२७ हेक्टर
   प्रादुर्भाव झालेले क्षेत्र   ४९ हजार ९९३ हेक्टर
   बाधित शेतकरी ३६ हजार ६७५ 
   जिल्ह्यात एकूण गावांमध्ये झालेला प्रादुर्भाव  ७६६

तालुकानिहाय स्थिती (हेक्टर)

नाशिक    ८७७   ७७
दिंडोरी  ६०२    १६४
कळवण   १८६४६   ६५८७
देवळा  १५४१७    ९३०
सटाणा    ३४६५३     ५९५४
मालेगाव    ३७४३२ ९६३०
नांदगाव   ३१४१० ७६८२
येवला  ३७८४०   १०९७०
चांदवड  १९५७१  २१५२
निफाड   ११८६४   ४१५३
सिन्नर  १४९९५   १६६४

 

इतर अॅग्रो विशेष
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...
आबासाहेब झाले ग्लॅडिओलस पिकातील मास्टरअभ्यासू, तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेतीचे उत्तम...
दूध पावडर निर्यात अनुदान नाकारल्याने...पुणे : निर्यात केलेल्या दूध पावडरला प्रोत्साहन...