अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
बातम्या
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या तडाख्यात
नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव अगदी सुरवातीपासूनच झाला आहे. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढले असले तरी, उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. विशेषतः येवला, मालेगाव, नांदगाव, कळवण व सटाणा या तालुक्यांमध्ये अळीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. अळीमुळे मका उत्पादनात घट होण्यासोबतच, चाराही कमी उपलब्ध होणार असल्याचे पशुपालक सांगत आहेत.

जिल्ह्यातील एकूण मका लागवडीचे प्रस्तावित क्षेत्र १ लाख ४३ हजार ६४५ हेक्टर असून, १३ तालुक्यांमध्ये २ लाख २३ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. म्हणजेच यंदा लागवडीत दीडपट वाढ झाली आहे. मात्र लागवड क्षेत्रापैकी ४९ हजार ९९३ हेक्टरवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची आकडेवारी कृषी विभागाकडे आहे. तर यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे मका उत्पादक शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात अगदी सुरुवातीला मक्याच्या क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव ९० टक्क्यांपेक्षा अधिक दिसून आला. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांच्या फवारण्या करून अळी पूर्णपणे नष्ट झाली नाही. सध्या २५ ते ३० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव आहे. त्यामुळे प्रतिएकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे.
लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी मक्यावर नांगर फिरवला तर काहींनी उपटून टाकला. पिकाची वाढ झाल्याने अळीने आता पानांवरून कणसांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्पादनांवर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मक्याचे पीक दृष्टिक्षेपात
जिल्ह्यातील एकूण लागवड | २ लाख २३ हजार ५२७ हेक्टर |
प्रादुर्भाव झालेले क्षेत्र | ४९ हजार ९९३ हेक्टर |
बाधित शेतकरी | ३६ हजार ६७५ |
जिल्ह्यात एकूण गावांमध्ये झालेला प्रादुर्भाव | ७६६ |
तालुकानिहाय स्थिती (हेक्टर)
नाशिक | ८७७ | ७७ |
दिंडोरी | ६०२ | १६४ |
कळवण | १८६४६ | ६५८७ |
देवळा | १५४१७ | ९३० |
सटाणा | ३४६५३ | ५९५४ |
मालेगाव | ३७४३२ | ९६३० |
नांदगाव | ३१४१० | ७६८२ |
येवला | ३७८४० | १०९७० |
चांदवड | १९५७१ | २१५२ |
निफाड | ११८६४ | ४१५३ |
सिन्नर | १४९९५ | १६६४ |