agriculture news in marathi Maize, wheat prices improve in Khandesh | Agrowon

खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मे 2020

जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत आहे. बाजारातील आवकही कमी होत आहे. मक्‍याचे दर प्रतिक्विंटल १२०० रुपये, तर गव्हाचे दर प्रतिक्विंटल १८५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. 

जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत आहे. बाजारातील आवकही कमी होत आहे. मक्‍याचे दर प्रतिक्विंटल १२०० रुपये, तर गव्हाचे दर प्रतिक्विंटल १८५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. 

मक्‍यासाठी जळगावमधील चोपडा, अमळनेर, जळगाव, मुक्ताईनगर, रावेर येथील बाजार प्रसिद्ध आहे. तर, गव्हासाठी जळगावमधील अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता.शिंदखेडा) व नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार हे बाजार प्रसिद्ध आहेत. अमळनेर येथील बाजार समिती मध्यंतरी कोरोनाचे संकट लक्षात घेता बंद होती. ही बाजार समिती सोमवारी (ता.१८) सुरू झाली आहे. यामुळे या बाजारातील मका, गव्हाची आवक, पुरवठा सुरू झाला आहे. दरात सुधारणा दिसत आहे. 

अमळनेरच्या बाजारात या आठवड्यात प्रतिदिन सरासरी अडीच हजार क्विंटल गव्हाची, तर मक्‍याची चार हजार क्विंटल आवक झाली आहे. तेथे मक्‍याच्या दरात सुधारणा दिसल्याने इतर बाजारांमध्येही दरात सुधारणा झाली आहे. तेथे मक्‍याला प्रतिक्विंटल किमान ११३० ते कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. यामुळे जळगाव, चोपडा येथील बाजारातही मका दरात सुधारणा होत आहे. दर १००० रुपयांवरून १२०० पर्यंत पोचले आहेत. 

लोकवन गव्हाचे दरही मध्यंतरी १६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते. त्यात मागील चार-पाच दिवसांत सुधारणा होत आहे. दर १८५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. दरात आणखी सुधारणा होवू शकते. कारण, मक्‍यासह गव्हाची बाजारांमधील आवक कमी झाली आहे. 
 

 


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम...अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक...सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून...
औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर १ लाख २१...लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून...
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त...
रत्नागिरी बाजार समितीत आंब्याची अडीच...रत्नागिरी ः कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत...
औरंगाबाधमध्ये हिरवी मिरची १००० ते १६००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबी ६०० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
केळी दरात सुधारणा, परराज्यात पाठवणी...जळगाव ः केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली...
नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...