Agriculture news in marathi Major damage to crops by free animals in Paithan taluka | Agrowon

पैठण तालुक्यात मोकाट जनावरांकडून पिकांचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 जुलै 2020

चार दिवसांपूर्वी मोसंबीची २२५ कलमे लावली होती. रात्रीतून मोकाट जनावरांनी ती कलमे संपवून टाकली. निवेदने देऊनही मोकाट जनावरांचा बंदोबस्त होत नसल्याने नुकसान सुरूच आहे. 
- अण्णासाहेब गीते, शेतकरी देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

मोकाट जनावरांचा मुक्काम असलेल्या झाडीजवळच माझे शेत आहे. शेताला तारेचे कंपाउंड केले, पण त्याचा उपयोग नाही. ही मोकाट जनावरे तार कंपाउंड तोडून माझ्या पिकाचे नुकसान करतात.
- गजानन राजगुडे, शेतकरी, एकतूनी, ता. पैठण, जि. औरंगाबाद
 

औरंगाबाद : शेकडोंच्या संख्येने कळपाने येऊन पिकांची नासधूस करणाऱ्या मोकाट जनावरांमुळे पैठण तालुक्यातील ८ ते १० गावांतील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. दुसरीकडे मागणी करूनही या जनावरांच्या बंदोबस्तासाठी प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलली जात नाहीत. उगवलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

जवळपास चार वर्षांपासून पैठण तालुक्यातील एकतूनी गाव शिवारातील दाट झाडीत ३०० ते ४०० मोकाट जनावरांचा कळप पावसाळ्याच्या सुरुवातीपासून साधारणतः चार ते पाच महिने मुक्कामाला असतो. दिवसा झाडीत मुक्काम, तर रात्री देवगाव, रजापूर, दाभरूळ, एकतूनी, घारेगाव, हिरापूर, थापटी, एकतूनी तांडा, थापटी तांडा आदी गाव शिवारातील खरिपाच्या पिकासह फळपिकांना हा कळप लक्ष्य करतो. आठवडाभरापूर्वी या कळपाने देवगाव येथील एका शेतकऱ्याची मोसंबीची चारशे कलमे संपून टाकली. आता पुन्हा देवगाव येथील अण्णासाहेब गीते या शेतकऱ्याची जवळपास २२५ मोसंबीची कलमे संपवून टाकली. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. 

याशिवाय देवगाव परिसरातील जवळपास शंभर एकरावरील खरिपाच्या पिकासह घारेगाव, एकतूनी, दाभरूळ आदी गावातील जवळपास चारशे एकरच्यावर शेतीपिकांचे चालू खरीप हंगामात मोकाट जनावरांनी उगवणीनंतर नुकसान केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

निवेदनांचा उपयोग होईना 

शेती पिकांचे नुकसान करणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी देवगावसह इतर गावांतील त्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासन वनविभागाकडे वारंवार निवेदने दिली. परंतु, त्याचा काही एक उपयोग झाला नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे होणारे नुकसान सहन करण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती त्रस्त शेतकऱ्यांनी दिली.

जीव धोक्यात घालून जागरण

मोकाट जनावरांपासून आपल्या पिकाचे रक्षण करण्यासाठी त्रस्त शेतकऱ्यांना रात्री शेतशिवारात गस्त घालण्याशिवाय पर्याय नाही. पाऊस, वारा वादळ व इतर धोके पत्करून रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात जागरण करण्याची वेळ आली आहे.


इतर बातम्या
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...