Agriculture news in marathi Major loss of soybean in Barshi taluka | Agrowon

बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

वैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्‍यात सर्वांत जास्त सोयाबीन क्षेत्र आहे. सध्या सोयाबीन पीक काढणीच्या भरात आहे. त्याच वेळी सतत पाऊस पडत असल्यामुळे तसेच पाणी व रोगट हवामानामुळे सोयाबीनचे पीक झाडालाच नासू लागले आहे. तर, काही ठिकाणी सोयाबीनचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

एकट्या बार्शी तालुक्‍यातच जवळपास ३५ हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन आहे. यापैकी जवळपास ७० टक्के सोयाबीन हातातून गेले आहे. सोयाबीनशिवाय उडीद, मूग आदी पिकांचाही समावेश तालुक्‍यात सर्वाधिक आहे. बार्शी तालुक्‍यातील अशा नुकसान झालेल्या मूग, उडीद व सोयाबीन पिकांचे पंचनामे करावेत, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसिलदार किरण जमदाडे यांना देण्यात आले. 

पानगाव, पागंरी, गौडगाव, मळेगाव पट्ट्यात सर्वाधिक नुकसान

पानगाव, पांगरी, गौडगाव, मळेगाव आदी बहुतेक सर्व पट्ट्यात सोयाबीन, उडीद आणि मूगाचे नुकसान झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या गावातील शेतकरी भास्कर काकडे, प्रमोद पाटील, युवराज काजळे, प्रशांत भड, संदीप भड आदींनी थेट तहसिलादरांना प्रत्यक्ष भेटून आपली कैफियत मांडली. आता प्रशासन त्याची दखल घेते का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

यंदा पाऊस वेळेवर झाल्याने सहा एकर सोयाबीन पेरले. पीक चांगले व काढणीला आले असताना, सतत सहा दिवस झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले. परिणामी, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. आता तातडीने पंचनामे करुन मदत मिळायला हवी.
- उत्कर्ष देशमुख, शेतकरी,  रातंजन, ता. बार्शी


इतर ताज्या घडामोडी
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...