आदर्श गोशाळांना पर्यटन केंद्र बनविणार : डॉ. वल्लभभाई कथारिया

 To make Adarsh ​​Goshala a tourist hub: Dr Vallabhbhai Katharia
To make Adarsh ​​Goshala a tourist hub: Dr Vallabhbhai Katharia

पुणे : देशातील कृषी विज्ञान केंद्रामध्ये केंद्र शासनाच्या पुढाकारातून गो-कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येईल. गोशाळांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. आदर्श गो शाळांना पर्यटन केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथारिया यांनी सांगितले. 

जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीची बैठक गुरुवारी (ता. २९) डॉ. कथारिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा, उपायुक्त डॉ. बाकरेवान, डॉ. शिवाजी विधाटे, डॉ. अनिल देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील, सहायक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, समितीचे सदस्य सुरेश रास्ते, संदीप नवले, नेहा पंचामिया आदी उपस्थित होते.

कौशल्य विकास विभागाद्वारे गोसंवर्धनासंदर्भात प्रशिक्षण व बळकटीकरणासाठी नियोजन करण्यात येईल. प्रत्येक शेतकऱ्यांकडे एक तरी गाय असावी, यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. कथारिया यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com