Agriculture news in marathi Make chutney, jam, pickles from the karvand fruit | Agrowon

करवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचे

माधुरी रेवणवार
बुधवार, 10 जून 2020

करवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची गरज नाही. फ्रुट कटर, पल्पर आणि बॉयलर असेल तर प्रक्रिया उद्योग उभा करू शकतो. महिला बचत गट किंवा शेतकऱ्यांसाठी हा चांगला प्रक्रिया उद्योग आहे.
 

करवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची गरज नाही. फ्रुट कटर, पल्पर आणि बॉयलर असेल तर प्रक्रिया उद्योग उभा करू शकतो. महिला बचत गट किंवा शेतकऱ्यांसाठी हा चांगला प्रक्रिया उद्योग आहे.

करवंद हे लोह, खनिजाचा उत्तम स्रोत आहे. अनेमिया, त्वचा रोग तसेच जखम लवकर भरून येण्यासाठी करवंदाचा उपयोग होतो.

करवंद चटणी
साहित्य 

करवंदाचा गर १ किलो, साखर१ किलो, वेलची१५ ग्रॅम, दालचिनी १५ ग्रॅम,
आले १५ ग्रॅम, लाल मिरची पावडर १५ ग्रॅम, बारीक केलेला कांदा ६० ग्रॅम, बारीक केलेला लसूण १५ ग्रॅम, मीठ ४० ग्रॅम, व्हिनेगर९० मिली, सोडियम बेन्झोएट २५० मिली.

कृती
कच्ची करवंदे देठ काढून पाण्याने स्वच्छ धुवून शिजवून घ्यावीत.चाळणीच्या साहाय्याने गर गळून घ्यावा.गरामध्ये साखर व मीठ मिसळून उकळत ठेवावे.वेलची, दालचिनी, मिरची पूड, आले, कांदा लसूण मलमलच्या कपड्यात बांधून ही पुरचुंडी उकळत्या गरात सोडावी.जॅमप्रमाणे चटणी घट्ट झाल्यावर पुरचुंडी पिळून काढून टाकावी. व्हिनेगर मिसळून दोन मिनिटे उकळावे व नंतर २५० मिली सोडियम बेन्झोएट मिसळावे.

करवंद लोणचे 
साहित्य

कच्ची करवंदे१.५ किलो, मीठ २५० ग्रॅम, मेथी२० ग्रॅम, हळद पूड ३० ग्रॅम, हिंग ५ ग्रॅम, लाल मिरची पावडर५० ग्रॅम, मोहरी पावडर१०० ग्रॅम, गोडे तेल २०० ग्रॅम, सोडियम बेन्झोएट १ ग्रॅम

कृती
करवंदाचे देठ काढून दोन ते तीनवेळा पाण्यात धुवून घ्यावीत. पुसून दोन भाग करावेत किंवा थोडे ठेचून घ्यावे. बिया काढून मोजलेल्या मिठाचे व हळदीचे अर्धे प्रमाण फोडींवर टाकून मिसळावे.४ ते ५ तासात पाणी सुटते. हे पाणी काढून टाकावे.तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी पीठ, मेथी मिसळून हलकेच भाजावे. हे तेल थंड झाल्यावर करवंदाच्या फोडींवर पसरावे. त्यामध्ये इतर साहित्य मिसळून घ्यावे. सर्वात शेवटी सोडियम बेन्झोएट टाकून लोणचे मिसळून घ्यावे. निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरून थंड जागी ठेवावे.

कच्च्या करवंदाचा जॅम:
साहित्य

करवंदाचा गर १ किलो, साखर१ किलो, सायट्रिक ॲसिड १ ग्रॅम, पोटॅशिअम मेटाबाय सल्फेट १ ग्रॅम

कृती

  • कच्ची करवंदे देठ काढून दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून घ्यावीत. एक किलोस दीड लिटर पाणी टाकून शिजवावे. शिजल्यानंतर कुस्करून घ्यावे. गळून गार बाजूला काढावा. बिया काढून शिजवले आणि नंतर गर काढला तरी चालतो. साखर सायट्रिक ॲसिड टाकून शिजवावे.
  • जॅम तयार झाला का नाही हे तपासण्यासाठी पाण्यामध्ये त्याचा थेंब टाकून पाहावा. न विरघळता गोळी तयार झाल्यास जॅम झाला असे समजावे किंवा एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण ६८ ब्रिक्स असावे. तयार जॅममध्ये सोडियम बेन्झोएट मिसळावे. गरम असताना निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरून थंड जागी ठेवावे.

कच्च्या करवंदाचा स्क़्वॅश
साहित्य

कच्च्या करवंदाचा रस १ किलो, साखर ९०० ग्रॅम, सायट्रिक ॲसिड १० ग्रॅम

कृती

  • कच्च्या करवंदाचे देठ काढून पाण्याने धुवून घ्यावेत.दुप्पट पाणी घालून करवंद फुटेपर्यंत शिजवावे.करवंद चाळणीतून दाबून गाळून रस वेगळा करावा.१ किलो तयार रसामध्ये साखर व सायट्रिक ॲसिड मिसळावे. साखर विरघळत नसल्यास थोडी उष्णता द्यावी.
  • एक किलो तयार स्क़्वॅशसाठी १ग्रॅम सोडियम बेन्झोएट मिसळावे. तयार स्क़्वॅश निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरून थंड जागी ठेवावा. हा स्क़्वॅश वापरत असताना त्यात २ ते ३ पट पाणी मिसळावे.

पिकलेल्या करवंदाचा स्क़्वॅश
साहित्य

करवंदाचा रस १ लि, साखर २ किलो, सायट्रिक ॲसिड १४ ग्रॅम, एक लिटर तयार रसाला सोडियम बेन्झोएट ०.२५ ग्रॅम

कृती
पूर्ण पिकलेली करवंद निवडून त्याचा बिया काढून रस काढून गळून घ्यावा.एक लिटर रसामध्ये दिलेल्या प्रमाणात साखर व सायट्रिक ॲसिड मिसळून घ्यावे. साखर विरघळत नसल्यास थोडी गरम करावी. शेवटी सायट्रिक ॲसिड मिसळून घ्यावे. निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत भरून थंड जागी ठेवावे. स्क़्वॅश वापरताना त्यात ३ पट पाणी मिसळावे.

संपर्क - माधुरी रेवणवार ९४०३९६२०१४
(विषय विशेषज्ञ, (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी,जि.नांदेड)


इतर कृषी प्रक्रिया
प्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...
शेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...
श्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने...
फणसामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...
फणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...
प्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत...
बहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....
प्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...
कोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...
करवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...
कलिंगडापासून तयार करा विविध...कलिंगड फळ खाण्याने किंवा ताजा रस पिल्याने...
जांभळापासून स्क्वॅश,जॅम,जेलीमे महिन्याच्या शेवटी व जून, जुलै महिन्यात...
राईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धीवेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव...
काजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
फळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण...
बचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...
अन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...
फळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...