agriculture news in Marathi make complaint on all seed companies Maharashtra | Agrowon

निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर गुन्हे दाखल करा : शेतकरी मराठा महासंघ

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत बाजरी, सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्याचा पुरवठा केल्यामुळे उगवण झाली नसल्याबाबत आत्तापर्यंत ७६८ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या.

नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत बाजरी, सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्याचा पुरवठा केल्यामुळे उगवण झाली नसल्याबाबत आत्तापर्यंत ७६८ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. याची चौकशी करून निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत. आठ दिवसात दखल घेतली नाही तर राज्यभरातील प्रत्येक कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकरी मराठा महासंघ आंदोलन करेल, असा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी दिला.

संभाजी दहातोंडे पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत बाजरी, सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्याचा पुरवठा केल्यामुळे उगवण झाली नसल्याबाबत आत्तापर्यंत ७६८ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. पंचनामे करून बियाणे उगवण झाली नाही, असे तालुका तक्रार निवारण समितीने स्पष्ट केले.

मात्र कोपरगाव व पारनेर येथे प्रत्येकी एका कंपनीवर गुन्हा दाखल केला असून तब्बल ३१ कंपन्यांनी निकृष्ट बियाणे पुरवठा केलेला आहे. इतर कंपन्यांवर गुन्हा दाखल का केला जात नाही?  त्यांना कोण पाठीशी घालत आहे? याची चौकशी करून निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत.  

स्वतः लक्ष घालून कारवाई करावी, आठ दिवसांत दखल घेतली नाही तर राज्यभरातील प्रत्येक कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकरी मराठा महासंघ आंदोलन करेल व कृषी कार्यालय कार्यकर्ते बंद करतील, असे शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...