बियाण्यांच्या किमती वाढवू नका ः कृषिमंत्री 

आगामी खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसह अन्य पिकांचे गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविताना त्यांच्या किमती वाढवू नका, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी ‘महाबीज’ला दिले आहेत.
dada_bhuse
dada_bhuse

अकोला ः आगामी खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसह अन्य पिकांचे गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविताना त्यांच्या किमती वाढवू नका, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी ‘महाबीज’ला दिले आहेत. सोबतच महाबीजने पालेभाज्यांच्या बियाणे निर्मितीमध्ये अधिक लक्ष घालावे, असेही सुचविले. 

दरवर्षी हंगामात महाबीजकडून तत्कालीन बाजारभाव लक्षात घेत बियाण्यांच्या किमतीत बदल केले जातात. याविरुद्ध ओरडही होत असते. यंदा कृषिमंत्र्यांनी आधीच दरवाढ न करण्याबाबत निर्देश दिल्याने हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकेल, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामासाठी बियाणे नियोजनाची बैठक झाली. या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले हे सुद्धा उपस्थित होते. 

बैठकीत कृषिमंत्र्यांनी हंगामाचे नियोजन करताना प्रतिहेक्टरी बियाण्यांची आवश्यकता तसेच बीज उत्पादक कंपन्यांनी केलेले नियोजन याबाबत आढावा घेतला. बियाणे विक्रीनंतर त्यासंदर्भात ट्रॅकिंग यंत्रणा तयार करावी. त्यामध्ये पुरवठा, विक्री आणि उपलब्धता अशा प्रकारे बियाण्यांची माहिती उपलब्ध होईल, अशी यंत्रणा एक एप्रिलपर्यंत तयार करावी, असेही निर्देश दिले. राज्यात कापसाचे क्षेत्र ४२ लाख हेक्टर आहे. राज्यामध्ये सध्या एक कोटी ६० लाख पाकिटे बीटी कापूस बियाणे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. 

दहा हजार शेतकरी कंपन्या स्थापन करणार  राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याची योजना यशस्वी करण्याकरिता पीक पद्धती, कृषी विद्यापीठ, सेवाभावी संस्था यांच्या विविध कार्यक्रमांची सांगड घालावी. या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा देणाऱ्या असाव्यात, असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com