agriculture news in Marathi, Make immediate offline registration of purchase of tur in Khandesh | Agrowon

खानदेशात तूर खरेदीबाबत ऑफलाइन नोंदणी तातडीने करा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय केंद्रांमध्ये कार्यवाही सुरू आहे; परंतु नोंदणीच कमी असल्याने खरेदी तोकडी किंवा अत्यल्प झाली आहे. फेब्रुवारीत दर हमीभावापर्यंत होते. यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रात विक्रीसंबंधी नोंदणी टाळली. आता दर दबावात असल्याने शासकीय केंद्रात तूर विक्री करण्याची वेळ आली आहे; परंतु ऑनलाइन नोंदणी असेल तर केंद्रात तूर विक्री करता येते. ही बाब लक्षात घेता ऑफलाइन नोंदणी तातडीने करून शासकीय केंद्रात विक्री करण्याची व्यवस्था शासनाने करावी, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय केंद्रांमध्ये कार्यवाही सुरू आहे; परंतु नोंदणीच कमी असल्याने खरेदी तोकडी किंवा अत्यल्प झाली आहे. फेब्रुवारीत दर हमीभावापर्यंत होते. यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रात विक्रीसंबंधी नोंदणी टाळली. आता दर दबावात असल्याने शासकीय केंद्रात तूर विक्री करण्याची वेळ आली आहे; परंतु ऑनलाइन नोंदणी असेल तर केंद्रात तूर विक्री करता येते. ही बाब लक्षात घेता ऑफलाइन नोंदणी तातडीने करून शासकीय केंद्रात विक्री करण्याची व्यवस्था शासनाने करावी, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

जळगाव जिल्ह्यात नऊ, धुळ्यात तीन आणि नंदुरबारात तीन तूर खरेदी केंद्र मंजूर आहेत. जळगावात पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, चोपडा, रावेर, यावल येथे तूर खरेदी केंद्र मंजूर आहेत. २३ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करून घ्यायची होती. ज्यांनी ही नोंदणी केली, त्यांच्याच तुरीची खरेदी केली जात आहे. परंतु फेब्रुवारीत तूर दर ५६०० रुपयांपर्यंत मुक्ताईनगर, रावेर, अमळनेर व चोपडा येथील बाजारात होते. तर विदर्भातील मलकापूर, नांदुरा भागात दर ५८०० रुपयांपर्यंत होते. नंतर दरांवर दबाव आला. 

मग शेतकऱ्यांनी बाजारात तूर विक्री करणे टाळले. दर वधारतील, अशी अपेक्षा होती, परंतु दर हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपयांनी कमीच आहेत. अशा रावेर, पाचोरा, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर भागातील अनेक शेतकऱ्यांनी तूर साठविली आहे. आता तूर विक्री करायची आहे, परंतु ती हमीभावापेक्षा कमी दरात कशी करावी, असा मुद्दा आहे. 

शासकीय केंद्रात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच तूर विक्री करण्यासंबंधी मोबाईलवर मेसेज आहे. हे मेसेज दाखवा आणि तूर विक्री करा, अशी कार्यवाही शासकीय खरेदीदार करीत आहेत. यामुळे तूर उत्पादक अडचणीत सापडले असून, त्यांच्या तुरीची हमीभावात खरेदी तातडीने व्हावी, यासाठी ऑफलाइन नोंदणी तातडीने करून लागलीच किंवा दोन दिवसांत त्यांच्या तुरीची खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

इतर बातम्या
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...